[वृत्त: वियद्गंगा]
खरा तो एकचि धर्म,
जगाला प्रेम अर्पावे
सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे,
जगाला प्रेम अर्पावे II २ II
सदा जे आर्त अति विकल,
जयांना गांजिती सकल
तया जाऊन हसवावे,
जगाला प्रेम अर्पावे II ४ II
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे,
जगाला प्रेम अर्पावे II ६ II
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे,
जगाला प्रेम अर्पावे II ८ II
असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे,
जगाला प्रेम अर्पावेII १० II
— साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)
टीप : सातवे आणि शेवटची तीन कडवी बालभारती पाठ्यपुस्तकात समाविष्ठ नाहीत.
गाणे ऐकण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा
खरा तो एकचि धर्म
खरा तो एकचि धर्म,
जगाला प्रेम अर्पावे
जयांना कोणी ना जगतीजगी जे हीन अति पतित,
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे,
जगाला प्रेम अर्पावे II १ II
सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे,
जगाला प्रेम अर्पावे II २ II
समस्तां धीर तो द्यावा,
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे,
जगाला प्रेम अर्पावे II ३ II
![]() |
चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई |
जयांना गांजिती सकल
तया जाऊन हसवावे,
जगाला प्रेम अर्पावे II ४ II
प्रभूची लेकरे सारीकुणा ना व्यर्थ शिणवावे,
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे,
जगाला प्रेम अर्पावे II ५ II
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे,
जगाला प्रेम अर्पावे II ६ II
असे जे आपणांपाशी,जिथे अंधार औदास्य
जिथे नैराश्य आलस्य,
प्रकाशा तेथ नव न्यावे II ७ II
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे,
जगाला प्रेम अर्पावे II ८ II
असे हे सार धर्माचेभरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे,
जगाला प्रेम अर्पावे II ९ II
असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे,
जगाला प्रेम अर्पावेII १० II
जयाला धर्म तो प्यारा,
जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे,
जगाला प्रेम अर्पावे II ११ II
— साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)
टीप : सातवे आणि शेवटची तीन कडवी बालभारती पाठ्यपुस्तकात समाविष्ठ नाहीत.
गाणे ऐकण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा
खरा तो एकचि धर्म