गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले
रजतनील, ताम्रनील स्थिर पल जल, पल सलीलदिन लंघुनि जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरिधुंद सजल हसित दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
पद्मरागवृष्टि होय माड भव्य न्हाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
तृप्तीचे धन घनांत बघुनि मन निवालें
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
उतट बघुनि हरिकरुणा, हरित धरा हो गहना
मंदाकिनि वरुनि धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
हिरव्या तटिं नावांचा कृष्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
तृण विसरूनि जवळिल ते खिळवि गगनिं डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
— बा. भ. बोरकर
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
धूसर हो क्षितिज त्वरित, ढोर पथी अचल चकितमीन चमकुनी उसळे, जलवलयीं रव मिसळे
नवथर रसरंग गहन करिति नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
तृण विसरूनि जवळिल ते खिळवि गगनिं डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
टप टप टप पडति थेंब मनि वनिंचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमि आशीर्वच बोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनि आले
— बा. भ. बोरकर