घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठी लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला
सायंकाळीं एकेमेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी
कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला
– शाहीर होनाजी बाळा
होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण "होनाजी बाळा" या एकाच नावाने ओळखल्या जातात.
उठी लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला
सायंकाळीं एकेमेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी
कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला
– शाहीर होनाजी बाळा
होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण "होनाजी बाळा" या एकाच नावाने ओळखल्या जातात.