A NON-PROFIT
A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR
रम्य ते बालपण!
'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.
साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!
साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!
सुचना:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.
येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.
ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.
कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.
येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.
ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.
कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
6 November 2026
5 November 2026
आंधळा
दाटला चहूकडे अंधार
निशिदिनी जाळी एकच चिंता मजला ही अनिवार जन्माची हि काठि सोबतिण
खात ठोकरा आधी आपण
बजाविते मज 'धरि रे धोरण
पद टाकी हळुवार' — दाटला चहूकडे अंधार खात ठोकरा आधी आपण
बजाविते मज 'धरि रे धोरण
असतिल हा हिज देवा, डोळे ?
खरे काय ते मजला न कळे
जोवरि ही मम करांत खेळे
हीच मला आधार — दाटला चहूकडे अंधार खरे काय ते मजला न कळे
जोवरि ही मम करांत खेळे
जग हे वदते, दिवस उगवला
अथवा चंद्रोदय तो झाला
दिव्य दैवते दिसति न डोळा
चंद्र-सूर्यही पार — दाटला चहूकडे अंधार अथवा चंद्रोदय तो झाला
दिव्य दैवते दिसति न डोळा
सुखदुःखाच्या घटिका स्मरुनी
येत जेधवा नयनां पाणी
अश्रु ढाळणे एवढेच या —
नयनांचे उपकार — दाटला चहूकडे अंधारयेत जेधवा नयनां पाणी
अश्रु ढाळणे एवढेच या —
जिथे उभा मी 'तेच सर्व जग'
सदन कशाला हवे मला मग ?
मिटली मात्र खरी ही दगदग
सगळे मम घरदार — दाटला चहूकडे अंधार सदन कशाला हवे मला मग ?
मिटली मात्र खरी ही दगदग
घडिली देवा, कशासि काया ?
तुझेच का रे स्तवन गावया ?
मूर्ति कोणती आणू हृदया ?
तूही पण अंधार — दाटला चहूकडे अंधारतुझेच का रे स्तवन गावया ?
मूर्ति कोणती आणू हृदया ?
– सोपानदेव चौधरी
Labels:
आंधळा~,
सोपानदेव चौधरी (१९०७ - १९८२)
अंधार पखाली
माणसा माणसांमध्ये कोण बांधीतसे भिंती
माणसाला माणसाची आज का रे वाटतसे भीती ?
काळोखाने आसमंती जीव होतो वर खाली
सोडतात कोण येथे अंधाराच्या या पखाली ?
जरी पेरती अंधार फुटू नये त्या अंकूर
हातातल्या ज्योतीसाठी नको कुणाची फुंकर
ज्योत ज्योतीने जागवा करा प्रकाश सोहळा
इवल्याश्या पणतीने होई आकाश पांगळा
– किशोर घोरपडे ( – २०२०)
माणसाला माणसाची आज का रे वाटतसे भीती ?
काळोखाने आसमंती जीव होतो वर खाली
सोडतात कोण येथे अंधाराच्या या पखाली ?
जरी पेरती अंधार फुटू नये त्या अंकूर
हातातल्या ज्योतीसाठी नको कुणाची फुंकर
ज्योत ज्योतीने जागवा करा प्रकाश सोहळा
इवल्याश्या पणतीने होई आकाश पांगळा
– किशोर घोरपडे ( – २०२०)
Labels:
अंधार पखाली~,
किशोर घोरपडे ( – २०२०)
सात रंग
रंग जांभळी कोणाचा ?
रंग बैगणी वांग्याचा ll १ ll
रंग निळा आकाशात
हिरवा नांदे गवतांत ll २ ll
पिवळा झेंडू कां डोले ?
नारंगी संत्रे खेळे ll ३ ll
लाल रंग तो रक्ताचा
तसा इंग्रजी राज्याचा ll ४ ll
सात रंग हे मिसळून
लख्ख पांढरे हो ऊन ll ५ ll
– ना. के. बेहेरे
रंग बैगणी वांग्याचा ll १ ll
रंग निळा आकाशात
हिरवा नांदे गवतांत ll २ ll
पिवळा झेंडू कां डोले ?
नारंगी संत्रे खेळे ll ३ ll
लाल रंग तो रक्ताचा
तसा इंग्रजी राज्याचा ll ४ ll
सात रंग हे मिसळून
लख्ख पांढरे हो ऊन ll ५ ll
– ना. के. बेहेरे
4 November 2026
नव लाख दिवे हे तुझ्या घरी !
नव लाख दिवे हे तुझ्या घरीं
हा अनंत पसरला नीलिमा,
शांत गभीर जयाची सुषमा,
विभूति ही प्रभुची नि:सीमा
धवल हिमाचल वर विस्तरला
अनंतांमधें विलीन झाला कां जातिस दुसऱ्यांच्या दारीं
हा अनंत पसरला नीलिमा,
शांत गभीर जयाची सुषमा,
विभूति ही प्रभुची नि:सीमा
नांदतसे तव शिरावरी
धवल हिमाचल वर विस्तरला
उदात्तरस शीकवी कवीला
बुध्दिस्थलिं तव वास करी
सामघोषमुखरित वनराई,
मधुनी जाई गंगामाई,
कलस्वनें ती गीतें गाई
तव हृदयावरि निरंतरीं
अनंत दुःखें हृदयीं धरिली,
अनंत गूढें मनीं वाहिली,
अनंत कन्यारत्नें असली
प्रसवलीस तूं धन्य खरी !
किति कविंनी किति काव्या गावें !
किती तुझे वैभव वर्णावें !
किती तुझे जयघोष करावें !
वंदे त्वां मांगलेश्वरी !
— विठ्ठल दत्तात्रय घाटे
3 November 2026
एक चित्ता
एकदा आला एक चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी.
मी म्हंटले "कशाला ?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."
मी गुपचूप घरात शिरलो
सुपारी घेऊन बाहेर आलो
सुपारी खाऊन गेला चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
खोटं वाटत तर पहा येऊन
अडकित्ता आहे घरात अजून.
कवी – विंदा करंदीकर

हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी.
मी म्हंटले "कशाला ?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."
मी गुपचूप घरात शिरलो
सुपारी घेऊन बाहेर आलो
सुपारी खाऊन गेला चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
खोटं वाटत तर पहा येऊन
अडकित्ता आहे घरात अजून.
कवी – विंदा करंदीकर
Labels:
एक चित्ता~,
बडबडगीत,
बालगीत,
विंदा करंदीकर (१९१८ – २०१०)
2 November 2026
घनश्याम सुंदरा श्रीधरा
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठी लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला
सायंकाळीं एकेमेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी
कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला
– शाहीर होनाजी बाळा
होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण "होनाजी बाळा" या एकाच नावाने ओळखल्या जातात.
उठी लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला
सायंकाळीं एकेमेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी
कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला
– शाहीर होनाजी बाळा
होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण "होनाजी बाळा" या एकाच नावाने ओळखल्या जातात.
5 October 2026
भुईनळ्यांचे झाड फुलांचे
भुईनळ्यांचे झाड फुलांचे
भिडे निळ्या आभाळी रे
आली फुलवित हासत उजळीत
लक्षदिप दिपवाळी रे
जमला मेळा गोपाळांचा
धुमधडाका फटाकड्यांचा
दिव्या दिव्यांची रांग शोभते
सुंदर निळ्या आभाळी रे
अवती भवती चंद्रज्योती
हासत उधळत माणिक मोती
दिव्या दिव्यांची रांग शोभते
सुंदर पहाटवेळी रे
ताई भाऊ नाचत या रे
मजेत आपण खेळू रे
दिपवाळीचा सजवू किल्ला
काढूनिया रांगोळी रे !
भुईनळ्यांचे झाड....
(अज्ञात कवी)
भिडे निळ्या आभाळी रे
आली फुलवित हासत उजळीत
लक्षदिप दिपवाळी रे
जमला मेळा गोपाळांचा
धुमधडाका फटाकड्यांचा
दिव्या दिव्यांची रांग शोभते
सुंदर निळ्या आभाळी रे
अवती भवती चंद्रज्योती
हासत उधळत माणिक मोती
दिव्या दिव्यांची रांग शोभते
सुंदर पहाटवेळी रे
ताई भाऊ नाचत या रे
मजेत आपण खेळू रे
दिपवाळीचा सजवू किल्ला
काढूनिया रांगोळी रे !
भुईनळ्यांचे झाड....
(अज्ञात कवी)
सौजन्य : Ranjeet
Labels:
अज्ञात कवी,
बालगीत,
भुईनळ्यांचे झाड फुलांचे~
26 July 2026
आवा चालली पंढरपुरा
परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ।।
आवा चालली पंढरपुरा । वेशीपासुनि आली घरा ।।
ऐकें गोष्टी सादर बाळे । करी जतन फुटकें पाळें ।।
माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ।।
वळवटक्षिरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ।।
उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ।।
भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ।।
भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ।।
सून म्हणे बहुत निकें । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ।।
सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ।।
सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं।।
सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेसें इला वाटे।।
आता कासया यात्रे जाऊं । काय जाउनी तेथें पाहूं।।
मुलें लेंकरें घरदार । माझें येथेंचि पंढरपूर ।।
तुका म्हणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ।।
– संत तुकाराम
आवा चालली पंढरपुरा । वेशीपासुनि आली घरा ।।
ऐकें गोष्टी सादर बाळे । करी जतन फुटकें पाळें ।।
माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ।।
वळवटक्षिरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ।।
उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ।।
भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ।।
भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ।।
सून म्हणे बहुत निकें । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ।।
सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ।।
सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं।।
सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेसें इला वाटे।।
आता कासया यात्रे जाऊं । काय जाउनी तेथें पाहूं।।
मुलें लेंकरें घरदार । माझें येथेंचि पंढरपूर ।।
तुका म्हणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ।।
– संत तुकाराम
6 April 2026
आनंदी पक्षी
केव्हा मारुन उंच भरारी
नभात जातो हा दूरवरी
आनंदाची सृष्टी सारी
आनंदी भरली..
आनंदाचे फिरती वारे
आनंदाने चित्त अवसरे
आनंदे खेळतो कसा रे !
आनंदी पक्षी..
हिरवे हिरवे रान विलसते
वृक्षलतांची दाटी जेथे
प्रीती शांती जिथे खेळते
हा वसतो तेथे..
सुंदर पुष्पे जिथे विकसली
सरोवरी मधु कमले फुलली
तरी तेथे सुंदर केली
बागडतो छंदे..
हासवितो लतिकाकुंजांना
प्रेमे काढी सुंदर ताना
आनंदाच्या गाऊन गाना
आनंदे रमतो..
जीवित सारे आनंदाचे
प्रेमरसाने भरले त्याचे
म्हणोनिया तो रानी नाचे
प्रेमाच्या छंदे !
बा आनंदी पक्ष्या, देई
प्रसाद अपुला मजला काही
जेणे मन हे गुंगुन जाई
प्रेमाच्या डोही..
उंच भराऱ्या मारित जाणे
रुप तुझे ते गोजिरवाणे !
गुंगुन जाईल चित्त जयाने
दे, दे ते गाणे !
नभात जातो हा दूरवरी
आनंदाची सृष्टी सारी
आनंदी भरली..
आनंदाचे फिरती वारे
आनंदाने चित्त अवसरे
आनंदे खेळतो कसा रे !
आनंदी पक्षी..
हिरवे हिरवे रान विलसते
वृक्षलतांची दाटी जेथे
प्रीती शांती जिथे खेळते
हा वसतो तेथे..
सुंदर पुष्पे जिथे विकसली
सरोवरी मधु कमले फुलली
तरी तेथे सुंदर केली
बागडतो छंदे..
हासवितो लतिकाकुंजांना
प्रेमे काढी सुंदर ताना
आनंदाच्या गाऊन गाना
आनंदे रमतो..
जीवित सारे आनंदाचे
प्रेमरसाने भरले त्याचे
म्हणोनिया तो रानी नाचे
प्रेमाच्या छंदे !
बा आनंदी पक्ष्या, देई
प्रसाद अपुला मजला काही
जेणे मन हे गुंगुन जाई
प्रेमाच्या डोही..
उंच भराऱ्या मारित जाणे
रुप तुझे ते गोजिरवाणे !
गुंगुन जाईल चित्त जयाने
दे, दे ते गाणे !
– बालकवी
Labels:
आनंदी पक्षी>,
बालकवी (१८९० – १९१८)
समाधी
या दूरच्या दूर ओसाड जागी किडे पाखारांवीन नाही कुणी
हा भूमिचा भाग आहे अभागी इथे एक आहे समाधी जुनी
विध्वंसली कालहस्तांमुळे ही हिला या पहा जागोजागी फटा
माती खड़े आणि आहेत काही हिच्या भोवती भंगलेल्या विटा
आहे जरी लेख हा छेद गेला जुन्या अक्षरातील रेघांमधुन
दुर्वांकुरे अन तरु खुंटलेला निघाला थरातील भेगांमधुन
कोठून ताजी फुले बाभळींनी हिला वाहिले फ़क्त काटकूटे
ही भंगलेली शलाका पुराणी कुणाचे तरी नाव आहे इथे
रानातलां ऊन मंदावलेला उदासीन वारा इथे वाहतो
फांदितलां कावळा कावलेला भुकेलाच इथे तिथे पाहतो
– ना. घ. देशपांडे (नागोराव घनश्याम देशपांडे)
हा भूमिचा भाग आहे अभागी इथे एक आहे समाधी जुनी
विध्वंसली कालहस्तांमुळे ही हिला या पहा जागोजागी फटा
माती खड़े आणि आहेत काही हिच्या भोवती भंगलेल्या विटा
आहे जरी लेख हा छेद गेला जुन्या अक्षरातील रेघांमधुन
दुर्वांकुरे अन तरु खुंटलेला निघाला थरातील भेगांमधुन
कोठून ताजी फुले बाभळींनी हिला वाहिले फ़क्त काटकूटे
ही भंगलेली शलाका पुराणी कुणाचे तरी नाव आहे इथे
रानातलां ऊन मंदावलेला उदासीन वारा इथे वाहतो
फांदितलां कावळा कावलेला भुकेलाच इथे तिथे पाहतो
– ना. घ. देशपांडे (नागोराव घनश्याम देशपांडे)
Labels:
ना.घ. देशपांडे (१९०९ - २०००),
समाधी>
5 April 2026
मोहरा इरेला पडला !
बेलाग दुर्ग जंजीरा वसईचा किल्ला असला
दुश्मन 'फिरंगी' तिथला आटोपे ना कोणाला !
त्या सिंहाला पकडाया भारतीय 'चिमणा' सजला !
दुश्मन 'फिरंगी' तिथला आटोपे ना कोणाला !
त्या सिंहाला पकडाया भारतीय 'चिमणा' सजला !
गोव्याचा टोपीवाला
कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयांला
बुद्धीचा डाव उडाला, मोहरा इरेला पडला ! || १ || कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयांला
मर्द त्या मराठी फौजा रणकीर्ति जयांच्या गाव्या
तळहातीं शिर घेउनियां चालूनि तटावरि जाव्या
जणुं घोंगावत मधमाशा मोहोळाला बिलगाव्या
कडकडाट वरुनी व्हावा
सारखा अग्नि वर्षावा
परि सिंहाचा तो छावा
परतेना हिंमतवाला, मोहरा इरेला पडला ! || २ ||सारखा अग्नि वर्षावा
परि सिंहाचा तो छावा
बोलावुनि सरदारांना तो समरधुरंधर बोले
"शूरांनो ! वेढा द्याया चार मास होऊनि गेले
आवडते कंठमणीही कार्य काय त्यांनीं केलें ?
बेहिंमत जे असतील
परतोनी ते जातील
मी आहे निश्चयशील
जा कळवा श्रीशाहूला," मोहरा इरेला पडला ! || ३ ||परतोनी ते जातील
मी आहे निश्चयशील
"घालुनी उडी संग्रामीं जिंकील भयंकर काळ
मी असा घेतला होता एकेक निवडुनी लाल
मी तुम्हांस मानित होतों शौर्याचे तेजोगोल
जाहली परीक्षा आजी
मति खिन्न जाहली माझी
म्हणतील काय ते बाजी ?
जा कळवा कीं दादाला, मोहरा इरेला पडला || ४ ||मति खिन्न जाहली माझी
म्हणतील काय ते बाजी ?
तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शिर तुटुनी त्या आघातें किल्ल्यात पडू द्या त्यातें
प्रिय असेन जरि तुम्हांतें पुरवाच अंतीमेच्छेतें. "
ती निर्वाणीची वाणी
डोळ्यांला आणी पाणी
प्रत्येक वदे गहिंवरुनी
'इर्षेस वीर हा चढला, मोहरा इरेला पडला !" ||५||डोळ्यांला आणी पाणी
प्रत्येक वदे गहिंवरुनी
लागला विषारी बाण सकलांच्या अंतःकरणी
शस्त्रांस पोंचले हात लढवय्यांचे फुरफुरुनी
उतरुनी रक्त डोळ्यांत नजराही गेल्या फिरुनी
ध्वनि 'हर हर' ऐसा झाला
पाठीच्या सुटल्या ढाला
बोलती सकल या बोला
"राखूं निज लौकीकाला," मोहरा इरेला पडला ! || ६ || पाठीच्या सुटल्या ढाला
बोलती सकल या बोला
गोळ्यांच्या माऱ्याखाली चर खोदोनी रेतींत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातींत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारांत
जो बांध तटाचा फुटला
तों सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला
बंदुकीस भाला भिडला मोहरा इरेला पडला ! || ७ ||तों सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला
कदमाच्या पुढतीं कदम चालले कदम सरदार
वारावरि करितचि वार अनुसरले शूर पवार
शिंध्यांचा खंदा घोडा चालला जणूं की तीर
बावटा धरुनि तोंडांत
भोंसला चढे जोमांत
आगीच्या वर्षावांत
सामना भयंकर झाला, मोहरा इरेला पडला ! || ८ ||भोंसला चढे जोमांत
आगीच्या वर्षावांत
गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितिकांच्या धडपडल्या
छातीचे निधडे वीर चिंध्या परि त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना
शत्रूची पकड सुटेना
तो विजयश्रीचा 'चिमणा'
बेहोष होऊनी लढला, मोहरा इरेला पडल ! || ९ ||शत्रूची पकड सुटेना
तो विजयश्रीचा 'चिमणा'
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावरि चढला
जयनादानें वसईचा दिग्प्रांत अहा ! दुमदुमला
पोर्तुगीज किल्लेवाला अप्पांच्या शरणीं आला
राष्ट्राची वाढे कीर्ती
तो समय आणि ती मूर्ती
ठाके कविनयनांपुढतीं
आठवतां या वाक्याला, 'मोहरा इरेला पडल !' || १० ||तो समय आणि ती मूर्ती
ठाके कविनयनांपुढतीं
— दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी
27 March 2026
दीपत्कार
परसातील कुंड्यांत सकाळी
दिवे लावले कुणी ?
बिनवातीचे बिनतूपाचे
निरांजनावाचुनी ?
उजाडल्यावर घराघरांतील
मालवले ना दिवे ?
अंगणात बाहेर मग अता
दिवे कशाला हवे ?
मालवले ना दिवे ?
अंगणात बाहेर मग अता
दिवे कशाला हवे ?
या सूर्याच्या उजेडातही
उजेड यांचा पडे !
नवल खरोखर कि विझती ना
वाऱ्यांच्या झापडे !
कुंड्यांतुनही दिव्यादिव्यांची
कशी मौज थाटते !
या आरतीने ओवाळावे —
देवाला, वाटते.
मज न काळे हि कशी दिव्यांची
जादू घडली असे ?
परसातील कुंड्यांत सकाळी
दिवे लागले कसे ?
कुणि सूर्य-परी करुन गेली
दिवेलागणी जणू !
तर या दीपत्काराला मी
शुभं करोति म्हणू ?
Labels:
दीपत्कार>
Subscribe to:
Posts (Atom)
