भुईनळ्यांचे झाड फुलांचे
भिडे निळ्या आभाळी रे
आली फुलवित हासत उजळीत
लक्षदिप दिपवाळी रे
जमला मेळा गोपाळांचा
धुमधडाका फटाकड्यांचा
दिव्या दिव्यांची रांग शोभते
सुंदर निळ्या आभाळी रे
अवती भवती चंद्रज्योती
हासत उधळत माणिक मोती
दिव्या दिव्यांची रांग शोभते
सुंदर पहाटवेळी रे
(अज्ञात कवी)
भिडे निळ्या आभाळी रे
आली फुलवित हासत उजळीत
लक्षदिप दिपवाळी रे
जमला मेळा गोपाळांचा
धुमधडाका फटाकड्यांचा
दिव्या दिव्यांची रांग शोभते
सुंदर निळ्या आभाळी रे
अवती भवती चंद्रज्योती
हासत उधळत माणिक मोती
दिव्या दिव्यांची रांग शोभते
सुंदर पहाटवेळी रे
(अज्ञात कवी)
2 comments:
ही कविता होती आम्हाला शाळेत ... पूर्ण विसरून गेले होते! इथे टाकल्याबद्दल आभार!
हि कविता मला खुप आठवते. मी पाहिली मध्ये असताना हि कविता मला होती. आमच्या मांटे बाईंनी आम्हाला हि कविता शिकवली होती. खुप मिस करतो ते बालपण आणि त्या सुंदर सुंदर कविता आणि धडे. बालपणीचा काळ सुखाचा
Post a Comment