वि. म. कुलकर्णी (१९१७ ते २०१०)
ज्येष्ठ कवी डॉ. विनायक महादेव ऊर्फ वि.म. कुलकर्णी यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९१७ रोजी सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी या लहानशा गावात झाला. वि.म. कुलकर्णी यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील एस. पी. कॉलेजातून झाले. १९४० मध्ये प्रथम क्रमांकाच्या 'तरखडकर' सुवर्णपदकासह बी.ए. आणि १९४२ मध्ये मुंबई विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने एम.ए. पदवी उत्तीर्ण झाले. "नाटककार खाडिलकर" या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी १९५० मध्ये पीएच. डी. संपादन केली. १९४४ ते १९५० या कालावधीत बेळगाव येथील लिंगराज कॉलेजमध्ये आणि त्यानंतर सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. दयानंद कॉलेजमधूनच मराठीचे विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यु. म. पठाण, डॉ. निर्मलकुमार फडकुले व श्री. सुशीलकुमार शिंदे हे त्यांचे विद्यार्थी होते.
साहित्याची कोणतीही पार्श्वभूमी नसूनही त्यांनी कवितेची कास धरली. "पहाटवारा" हा वि.मंचा पहिला कवितासंग्रह १९४९ मध्ये प्रकाशित झाला. "विसर्जन" हे त्यांचे दिर्घ प्रेमकाव्य १९४३ मध्ये प्रसिद्ध झाले. "कमळवेल", "अश्विनी", "भाववीणा", "पाऊलखुणा", "प्रसादरामायण" आणि "मृगधारा" या कवितासंग्रहांबरोबरच "फुलवेल", "ललकार", "चंद्राची गाडी", "छान छान गाणी", "अंगतपंगत", "रंगपंचमी", "नवी स्फूर्तिगीते" हे त्यांचे बालगीतसंग्रह प्रसिद्ध आहेत. 'गाडी आली गाडी आली झुक झुक झुक" या बालागीताने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या कवितेत बंडखोरी नव्हती की आक्रमकताही तरीही दशकानुदशकं ती काव्यरसिकांना आकर्षून घेत राहिली. त्यांनी "न्याहारी" या कथासंग्रहासह "आहुती" आणि अनुवादित "नोकाडुबी" या कादंबऱ्यांचे लेखन केले. "गरिबांचे राज्य" या चित्रपटासाठी त्यांनी कथालेखनही केले.
वि.म. कुलकर्णी यांच्या काही कविता गीतरूपाने रसिकांसमोर आल्या. गजाननराव वाटवे यांच्या आवाजातील 'माझा उजळ उंबरा' आणि 'माझा पानमळा', कमलाकर भागवत यांच्या स्वरातील 'माझ्या मराठीची गोडी', वसंतराव देशपांडे यांच्या स्वरांतील 'सावधान' आणि पंडितराव नगरकर यांच्या आवाजातील 'आम्ही जवान देशाचे' या लोकप्रिय गीतांचे ते निर्माते होते. त्यांना "गदिमा पुरस्कार", "कविश्रेष्ठ भा. रा. तांबे पुरस्कार" आणि "दिनकर लोखंडे बालसाहित्यिक पुरस्कार" अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 'वृत्ते व अलंकार', 'साहित्य दर्शन', 'मुक्तेश्वर सभापर्व', 'मराठी सुनीत', 'रामजोशीकृत लावण्या', 'झपूर्झा', 'पेशवे बखर' या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले होते.
गुरुवार दिनांक १३ मे २०१० रोजी वि. म. कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने (वय वर्षे ९२) निधन झाले.
(सौजन्य : सकाळ वृत्तसेवा)

~~~~~~~***~~~~~~~
No comments:
Post a Comment