अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो, गातो
तुझ्या गुणांच्या कथा
चंद्र-सूर्य हे तुझेच देवा
तुझी गुरे वासरे
तुझीच शेते, सागर, डोंगर,
फळे, फुले, पाखरे
अनेक नावे तुला,
तुझे रे दाही दिशांना घरं
करिसी देवा सारखीच तू
माया सगळ्यांवर
खूप शिकावे, काम करावे,
प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा
हीच एक मागणी
— संजीवनी मराठे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो, गातो
तुझ्या गुणांच्या कथा
चंद्र-सूर्य हे तुझेच देवा
तुझी गुरे वासरे
तुझीच शेते, सागर, डोंगर,
फळे, फुले, पाखरे
अनेक नावे तुला,
तुझे रे दाही दिशांना घरं
करिसी देवा सारखीच तू
माया सगळ्यांवर
खूप शिकावे, काम करावे,
प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा
हीच एक मागणी
4 comments:
Khupch chhan prarthana ahe, aamchya lahanpni hich hoti aamhala ani ata aamchya mulanna pn ahe...
सुंदर प्रार्थना आहे लेखकांना नम्र प्रणाम , लेखकांच नाव कळालं असत तर बरं झालं असत
कवयित्री संजीवनी मराठे ह्या आहेत. नाव वर दिलेले आहे.
https://www.youtube.com/watch?v=MIhHebQSD9I&lc=UgwM1--yiP4thUSA8rV4AaABAg
कविता खूप छान आहे.. या कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिषेक कुलकर्णी
kulkarni.abhishek12@gmail.com
Post a Comment