होतो पुस्तक घेउनि सहज मी दारात त्यांच्या उभा,
बाला तोंच समोरूनि कुणीतरी आली त्वरेने पुढे
वार्याने उडुनी पुनःपुनरपी चंद्रास जे झाकिती
मागे सारित-सांवरीत पदरा-ते मोकळे कुंतल,
किंचित हासूनि बोलली मजसि ती अस्पष्ट काही तरी,
किंवा स्पष्ट असेल ते, समजले माते न तेव्हा पण;
होतो स्तब्ध तसाच मी, मजकडे डोळे तिचे लागले;
त्यांचे तेज खुले मुखावरी; रवी जाताच खाली जरा
त्याची मावळती प्रभा पसरूनि रंगे जशी वारूणी,
गोर्या, नाजुक या तनूवर तशी शोभे छटा तांबुस;
नाही पार्थीव भाव ज्यास शिवले, स्वर्गीय जे शैशव
त्याची ही रमणीय मूर्तिच उभी माझ्याकडे राहिली.
मी त्यानंतर पाहिले नच तिला, वर्षे किती लोटली?
चित्ताच्या क्षितीजावरून परि ती नाही उषा लोपली.
- ग. त्र्यं. माडखोलकर

1 comment:
सप्रेम नमस्कार.
अमेरिकेतील माझे एक मित्र सध्या गंभीर आजारी आहेत.त्यांनी विनंती केली आहे,की त्यांना समुद्र, आकाश.पाऊस,पक्षी यांच्यावरील कविता पाठवाव्यात. मी त्यांना आपल्या अनुदिनीचा पत्ता दिला आहे. आपला इमेल आय.डी.कळवावा. तसेच आपण अशा काही कविता सुचवल्या तर फार बरे होईल.
मंगेश नाबर.
Post a Comment