उंच उंच डोंगर भवती I चढले नील नभांत
भिरभिर वारा व्यापुनियां I टाकी सारा प्रांत II १ II
तरुवेलींनीं फुललेल्या I त्या खोऱ्यांत सुरेख
झुळझुळ वाहे निर्झरिणी I स्फटिकावाणी एक II २ II
तोंच कुणी चपळाईनें I डोंगर वेधुन थोर
करवंदे विकण्यासाठी I ये भिल्लाचा पोर II ३ II
शाळिग्रामासम काळा I देह कसा घोटींव
तेजदार नागावाणी I दिसे कोवळा जीव II ४ II
स्वच्छ गोल डोळ्यांत नसे I भीतीचा लवलेश
साधा भोळा भाव मुखी I आणि दिसे आवेश II ५ II
ओठ चिमुकले विलग जरा I होती मधुन मधून
शुभ्र हिरकण्यांसम दिसती I दंत किती शोभून II ६ II
एक करीं घेऊनि परशू I दुसऱ्या हातीं द्रोण
"करवंदे घ्या करवंदे" I सांगतसे गर्जून II ७ II
असेल याची पर्णकुटी I जवळच रम्य निवांत
मातापितरांसह तेथे I रहात हा सौख्यांत II ८ II
स्वातंत्र्याचा खराखुरा I शाहिर आहे हाच
नागरवस्तीचा नाही I या जीवाला जाच II ९ II
पक्ष्यांची ऐकत गाणी I देत तयांना ताल
हिंडावे रानोरानीं I आनंदांत खुशाल II १० II
घाट सोडुनी कधीच ये I गाडी निघुनी दूर
परि न हले डोळ्यांपुढुनी I तो भिल्लाचा पोर. II ११ II
— गोपीनाथ (गोपीनाथ गणेश तळवलकर)