केव्हा मारुन उंच भरारी
नभात जातो हा दूरवरी
आनंदाची सृष्टी सारी
आनंदी भरली..
आनंदाचे फिरती वारे
आनंदाने चित्त अवसरे
आनंदे खेळतो कसा रे !
आनंदी पक्षी..
हिरवे हिरवे रान विलसते
वृक्षलतांची दाटी जेथे
प्रीती शांती जिथे खेळते
हा वसतो तेथे..
सुंदर पुष्पे जिथे विकसली
सरोवरी मधु कमले फुलली
तरी तेथे सुंदर केली
बागडतो छंदे..
हासवितो लतिकाकुंजांना
प्रेमे काढी सुंदर ताना
आनंदाच्या गाऊन गाना
आनंदे रमतो..
जीवित सारे आनंदाचे
प्रेमरसाने भरले त्याचे
म्हणोनिया तो रानी नाचे
प्रेमाच्या छंदे !
बा आनंदी पक्ष्या, देई
प्रसाद अपुला मजला काही
जेणे मन हे गुंगुन जाई
प्रेमाच्या डोही..
उंच भराऱ्या मारित जाणे
रुप तुझे ते गोजिरवाणे !
गुंगुन जाईल चित्त जयाने
दे, दे ते गाणे !
नभात जातो हा दूरवरी
आनंदाची सृष्टी सारी
आनंदी भरली..
आनंदाचे फिरती वारे
आनंदाने चित्त अवसरे
आनंदे खेळतो कसा रे !
आनंदी पक्षी..
हिरवे हिरवे रान विलसते
वृक्षलतांची दाटी जेथे
प्रीती शांती जिथे खेळते
हा वसतो तेथे..
सुंदर पुष्पे जिथे विकसली
सरोवरी मधु कमले फुलली
तरी तेथे सुंदर केली
बागडतो छंदे..
हासवितो लतिकाकुंजांना
प्रेमे काढी सुंदर ताना
आनंदाच्या गाऊन गाना
आनंदे रमतो..
जीवित सारे आनंदाचे
प्रेमरसाने भरले त्याचे
म्हणोनिया तो रानी नाचे
प्रेमाच्या छंदे !
बा आनंदी पक्ष्या, देई
प्रसाद अपुला मजला काही
जेणे मन हे गुंगुन जाई
प्रेमाच्या डोही..
उंच भराऱ्या मारित जाणे
रुप तुझे ते गोजिरवाणे !
गुंगुन जाईल चित्त जयाने
दे, दे ते गाणे !
– बालकवी
No comments:
Post a Comment