परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ।।
आवा चालली पंढरपुरा । वेशीपासुनि आली घरा ।।
ऐकें गोष्टी सादर बाळे । करी जतन फुटकें पाळें ।।
माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ।।
वळवटक्षिरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ।।
उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ।।
भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ।।
भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ।।
सून म्हणे बहुत निकें । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ।।
सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ।।
सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं।।
सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेसें इला वाटे।।
आता कासया यात्रे जाऊं । काय जाउनी तेथें पाहूं।।
मुलें लेंकरें घरदार । माझें येथेंचि पंढरपूर ।।
तुका म्हणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ।।
– संत तुकाराम

No comments:
Post a Comment