मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।
'मी कागद झाले आहे - चल लिही' असे ती वदली।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।
पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले।आभाळ म्हणाले 'नाही' - भूमीही म्हणाली 'नाही'।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।
दगडाची पार्थिव भिंत - ती पुढे अकल्पित सरली।की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।
'मी कागद झाले आहे - चल लिही' असे ती वदली।
– मनमोहन नातू