या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे
— मंगेश पाडगांवकर
रंगांचा उघडूनीया पंखा, सांज कुणीही केलीचंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही मातीबाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणासाठी, गाणे गात झुरावे
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे
— मंगेश पाडगांवकर