माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार
तुकोबाच्या अभंगाला
टाळ चिपळ्यांची साथ,
वाजताहे रानवारा
चिवारीच्या झुडुपांत !
पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाला आपोआप
अवखळ बाळापरी
पक्षी खेळतो मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत !
धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी !
गावानेच उंच केला—
हात दैवी प्रसादास,
भिजुनिया चिंब झाला
गावदेवीचा कळस.
निसर्गाने दिले धन—
—द्यावे दुसऱ्यां, जाणुनी,
झाली छप्परे उदार
आल्या पागोळ्या अंगणी !
स्नान झाले धरणीचे
पडे सोन्याचा प्रकाश !
आता बसेल माउली
अन्नब्रम्हाच्या पूजेस !
— ग. दि. माडगुळकर
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार
तुकोबाच्या अभंगाला
टाळ चिपळ्यांची साथ,
वाजताहे रानवारा
चिवारीच्या झुडुपांत !
पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाला आपोआप
अवखळ बाळापरी
पक्षी खेळतो मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत !
धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी !
गावानेच उंच केला—
हात दैवी प्रसादास,
भिजुनिया चिंब झाला
गावदेवीचा कळस.
निसर्गाने दिले धन—
—द्यावे दुसऱ्यां, जाणुनी,
झाली छप्परे उदार
आल्या पागोळ्या अंगणी !
स्नान झाले धरणीचे
पडे सोन्याचा प्रकाश !
आता बसेल माउली
अन्नब्रम्हाच्या पूजेस !
— ग. दि. माडगुळकर
3 comments:
Unmesh Inamdar यांच्या मदतीने दुरुस्त केलेली सुधारीत आवृत्ती.
@ उन्मेष,
चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे.
खूप सुंदर
शाळेत असताना ४थी ५वी ला शाळा सुरू होताच ही कविता शिकवली गेली होती. लयबद्ध चालीवर अनेक पारायण झाली त्यामुळे कविता कधीच विसरू शकत नाही.
जुने दिवस जुन्या आठवणी ते शिक्षक सगळा काळ चित्रपटासारखा डोळ्यासमोर तरळून जातो.
खुप छान वाटतं…
विजय वगळ
Post a Comment