ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला ! ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूंता l मी नित्य पाहिला होता;
मज वदलासी अन्य देशिं चल जाउं l सृष्टिची विविधता पाहू.
तैं जननीहृद् विरहशंकितहि झालें l परि तुवां वचन तिज दिधलें,
'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन l त्वरित या परत आणीन !'
सागरा, प्राण तळमळला ! ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूंता l मी नित्य पाहिला होता;
मज वदलासी अन्य देशिं चल जाउं l सृष्टिची विविधता पाहू.
तैं जननीहृद् विरहशंकितहि झालें l परि तुवां वचन तिज दिधलें,
'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन l त्वरित या परत आणीन !'
गंभीर त्वदाकृति बघुनी, मी"येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला l सागरा, प्राण तळमळला ! ॥ १ ॥
विश्वसलों या तव वचनीं, मी
जगद्नुभवयोगे बनुनी, मी
तव अधिक शक्त उद्धरणी, मी
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं l ही फसगत झाली तैशी !
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं l दशदिशा तमोमय होती,
गुण-सुमनें मी वेंचियली या भावें l कीं, तिनें सुगंधा घ्यावें !
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा l हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रेफुलबाग मला, हाय ! पारखा झाला l सागरा, प्राण तळमळला ! ॥ २ ॥
नवकुसुमयुता त्या सुलता, रे
तो बालगुलाबही आतां, रे
नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा l मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद इथे रम्य; परी मज भारी l आईची झोंपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा l वनवास तिच्या जरि वनिचा.
भुलविणें व्यर्थ हें आतां, रेत्वदविरहाची शपथ घालितो तुजला l सागरा, प्राण तळमळला ! ॥ ३ ॥
बहु जिवलग गमते चित्ता, रे --
तुज सरित्पते, जी सरिता, रे
या फेन-मिषें हंससि, निर्दया, कैसा l कां वचन भंगिसी ऐसा?
त्वस्वामित्वा सांप्रत जी मिरवीते l धकुनि कां आंग्लभूमीतें,
मन्मातेला अबल म्हणुनी फसवीसी ? l मज विवासना तें देशी?
तरि आंग्लभूमि-भयभीता, रेजो आंचमनी एक पळीं तुज प्याला l सागरा, प्राण तळमळला ! ॥ ४ ॥
अबला न माझिही माता, रे
कथिल हें अगस्तिस आतां, रे
- स्वा. विनायक दामोदर सावरकर
२७ मे १९३८ रोजी 'मराठा' या वृत्तपत्रात हे काव्य प्रसिद्ध झाले. भा. द. खेर यांनी लिहिलेल्या सावरकरचरित्रात तात्यारावांनी १० डिसेंबर १९०९ रोजी हे काव्य लिहिल्याचा उल्लेख केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरानी ब्रायटनच्या समुद किना-यावर लिहिलेल्या या काव्याला १० डिसेंबर २००९ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षानंतर आजही या ओळी अंगावर रोमांच उभे करतात. ब्रायटनच्या किना-यावर चिंतन करत असताना, तात्यारावांच्या मनात आत मातृभूमीची ओढ लागली होती. त्या भावनावेगातच त्यांना हे उत्कट काव्य स्फुरले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र निरंजन पाल होते त्यांनी हे काव्य लिहून घेतले.
4 comments:
Hi kavita shalet kontya iyatet shikvali jayachi
खूप छान पण मला असं वाटत की कवितेचा संदर्भ व सावरकरांचा कविता लिहितानाचा प्रसंग व्यक्त करावा
धन्यवाद
मी शाळेत असताना दहावीत मराठीच्या पुस्तकात अंदमनातून सुटका या धड्यातून सावरकांबद्दल आदर वाढला आणि कुतूहल ही वाढले . पुढे जाऊन बारावीत असताना सागरास ही कविता पण खूप च भावार्थ सहित शिकवली गेली . आत्ता तश्या शिकवण्या ही नाही आणि आवडीने शिकणारा विध्यार्थी वर्ग ही नाही.
Nice very good but can't understand what Swanteraveer sawarkar want to say Btw I just compliting my project and now I am satisfied with writing it all it really takes time the unknown words first and second valentine's
Thanks
Post a Comment