मी एक पक्षिण आकाशवेडी
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणांतळी.
घुसावे ढगामाजि बाणापरी,
ढ्गांचे अबोली भुरे केशरी रंग
माखून घ्यावेत पंखावरी.
घुसावे ढगामाजी बाणापरी
ढगांचे अबोली बुरे केशरी रंग
माखुन घ्यावेत अंगावरी
- पद्मा गोळे
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणांतळी.
स्वप्नांत माझ्या उषा तेवते अनअशी झेप घ्यावी, असे सूर गावे,
निशा गात हाकारिते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय़ नीडांतुनी अन
विजा खेळती मत्त पंखांतुनी.
घुसावे ढगामाजि बाणापरी,
ढ्गांचे अबोली भुरे केशरी रंग
माखून घ्यावेत पंखावरी.
गुजे आरुणी जाणुनी त्या ऊषेशीकीती उंच जावे कीती सूर गावे
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारिते काय वीणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर.
घुसावे ढगामाजी बाणापरी
ढगांचे अबोली बुरे केशरी रंग
माखुन घ्यावेत अंगावरी
किती उंच जाईन, पोचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी!
- पद्मा गोळे