A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

25 November 2021

टोपण

टोपणनावाने लिहिणारे मराठी साहित्यिक, गद्यलेखक, कवी मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवि-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले. १९६० पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे. काही मराठी आणि अन्य भारतीय कवींच्या टोपणनावांची ही यादी : 



— – अ अकिंचन — वासु. ग. मेहेंदळे 
अनंतफंदी — अनंत भवानीबावा घोलप 
अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा — विठ्ठल अनंत पिंपळगावकर 
अनंततनय — दत्तात्रेय अनंत आपटे 
आनंदतनय — गोपाळ आनंदराव देशपांडे 
अनिल — आत्माराम रावजी देशपांडे 
अनिल भारती — शान्ताराम पाटील अशोक (कवी) — नारायण रामचंद्र मोरे 
अज्ञातवासी — दिनकर गंगाधर केळकर 
आधुनिक नीळकंठ — बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर

 इ 
इंदिरा संत — इंदिरा नारायण संत ( – ) 
इंदुकांत — दिनकर नानाजी शिंदे ( – ) 

उ 
उदासी/हरिहरमहाराज — नीलकंठ रामकृष्ण पाळंदे 
उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/ उद्धव xxxx कोकिळ

 ए

 एकनाथ, एकाजनार्दन — एकनाथ सूर्यनारायण पैठणकर एक मित्र, 
विनायक — विनायक जनार्दन करंदीकर

 क 
कवीश्वरबास/भानूभट — भास्करभट्ट xxxx बोरीकर कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठल काव्यशेखर — भास्कर काशीनाथ चांदूरकर काव्यविहारी — धोंडो वासुदेव गद्रे 
कांत — वा.रा. कांत 
किरात/भ्रमर — कृष्णाजी लक्ष्मण सोमण 
कुंजविहारी — हरिहर गुरुनाथ सलगरकर 
कुमुदबांधव — स.अ. शुक्ल 
कृष्णकेशव — अनुपलब्ध 
कुसुमाग्रज — विष्णू वामन शिरवाडकर 
कृष्णाग्रज — य. म गद्रे 
केशवकुमार — प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे
 केशवसुत — कृष्णाजी केशव दामले 
के.(केशव) नारायण काळे 
के.स.रि. — केशव सदाशिव रिसबूड 
कोणीतरी — नरहर शंकर रहाळकर

 ख
 ग 
 गोपीनाथ — गोपीनाथ तळवलकर गोमा गणेश — गणेश कृष्ण फाटक 
गोविंद — गोविंद दत्तात्रय दरेकर
 गोविंदपौत्र — श्रीधर व्यंकटेश केतकर 
गोविंदप्रभु — गुंडम अनंतनायक राऊळ 
गोविंदाग्रज — राम गणेश गडकरी 
ग्रेस — माणिक सीताराम गोडघाटे 

 च 
चक्रधर — श्रीचांगदेव राऊळ 
चंद्रशेखर — चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे 
चेतोहर — परशुराम नारायण पाटणकर 

ज 
 जगन्नाथ — जगन्नाथ धोंडू भांगले 
जगन्मित्र —रेव्हरंड नारायण वामन टिळक 
जननीजनकज — पु.पां गोखले 

 ज 
 झ 
ट 
 टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती — वासुदेव गणेश टेंबे 

ठ 
ड 
 ढ
 ढोलीबुवा/महीपतिनाथ — सखाराम केरसुणे 

 त 
 तुकाराम/तुका — तुकाराम बोल्होबा/बाळकोबा मोरे/अंबिले/आंबले 

 थ
 द
 दत्त — दत्तात्रय कोंडो घाटे ( – ) 
दया पवार — दगडू पवार ( – ) 
दामोदर — वीरेश्वर सदाशिव ऊर्फ तात्या छत्रे 
दा.ग.पा. — दामोदर गणेश पाध्ये 
दासोपंत/ दिगंबरानुचर — दासो दिगंबर देशपांडे 
दित्जू/माधव जूलियन — माधव त्र्यंबक पटवर्धन 

ध 
 न 
 नामदेव — नामदेव दामाशेटी शिंपी 
नारायणसुत — श्रीपाद नारायण मुजुमदार 
निकुंब — कृष्ण बलवंत निकुंब (२२ नोव्हेंबर १९१९ – जून १९९९) 
निरंजन —वसंत सदाशिव बल्लाळ 
निशिगंध — रा.श्री. जोग 
निळोबा — निळा मुकुंद पिंपळनेरकर
 नीरजा — नीरजा साठे 
नृसिंहसरस्वती — नरहरी माधव काळे

 प
 पठ्ठे बापूराव — श्रीधर कृष्ण कुलकर्णी (रेठरेकर) 
पद्मविहारी — रघुनाथ गणेश जोशी 
पद्मा — पद्मा गोळे
 पी.सावळाराम —निवृत्तिनाथ रावजी पाटील 
पुरु.शिव. रेगे — पु.शि. रेगे 
पूर्णदास — बाबा उपसकर-राजाध्यक्ष 
प्रभाकर शाहीर — प्रभाकर जनार्दम दातार 

फ 
 फुलारी/बी रघुनाथ — भगवान रघुनाथ कुळकर्णी 

 ब 
बहिणाबाई — बहिणाबाई नथूजी चौधरी ( – 
) (संत) बहिणाबाई — कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक) 
बाबा आमटे — मुरलीधर देवीदास आमटे 
बाबुलनाथ — विनायक श्यामराव काळे

 बालकवी/कलापी — त्र्यंबक बापूजी ठोंबरे
 बाळा — बाळा कारंजकर 
बी; B — बाळकृष्ण अनंत भिडे 
बी; BEE — नारायण मुरलीधर गुप्ते 
बी रघुनाथ/फुलारी — भगवान रघुनाथ कुळकर्णी बोधलेबुवा — माणकोजी भानजी जगताप 

 भगवानकवि — भवान रत्नाकर कर्‍हाडकर 
भानजी — भास्कर त्रिंबक देशपांडे 
भानुदास/मामळूभट — भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा) 
भावगुप्तपद्म — पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी भावशर्मा भालेंदु — भालचंद्र/गुलाबराव सीताराम सुकथनकर भ्रमर/किरात — कृष्णाजी लक्ष्मण सोमण म मंदार — एकनाथ पांडुरंग रेंदाळकर ( – ) मध्वमुनीश्वर त्रिंबक नारायणाचार्य (आडनाव अनुपलब्ध) मनमोहन — गोपाळ नरहर उर्फ मनमोहन नातू मनोहरबंधू भास्कर कृष्ण उजगरे महिपती — महिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर महीपतिनाथ/ढोलीबुवा सखाराम केरसुणे माणिक/माणिकप्रभू/माणिकबाबा माणिक मनोहर नाईक, हरकुडे माधव — माधव केशव काटदरे माधव जूलियन, दित्जू/मा.जू./एम्.जूलियन — माधव त्र्यंबक पटवर्धन माधव मिलिंद — कॅ. मा.कृ. शिंदे माधवसुत — दामोदर माधव कुळकर्णी माधवानुज — काशीनाथ हरी मोडक मीरा मीरा तारळेकर मुकुंदराय — मुकुंद गणेश मिरजकर मुक्ताबाई/मुक्ताई — मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी मुक्तिबोध — शरच्चंद्र माधब मुक्तिबोध मुक्तेश्वर — मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल मोरो गणेश लोंढे मोरोपंत — मोरेश्वर रामचंद्र पराडकर

 य 
यशवंत — यशवंत दिनकर पेंढरकर ( – ) 
यशोधरा — यशोधरा साठे 
योगेश — भालजी पेंढारकर

 र
 रंगनाथ स्वामी (निगडीकर) रंगनाथ बोपाजी घोडके 
रघुनाथ पंडित/रघुनाथ — रघुनाथ पंडित चंदावरकर गणेश नवहस्त/नवाथे 
रमेश बाळ — बाळ सीताराम मर्ढेकर 
राजहंस — यादव शंकर वावीकर राधारमण — कृष्णाजी पांडुरंग लिमये रामजोशी/कविरा

य — 
राम जनार्दन जोशी 
रामदास — नारायण सूर्याजी ठोसर 

 व 
वसंत — वासुदेव बळवंत पटवर्धन ( – ) डॉ. वसंत अवसरे वसंतविहार — शंकर दत्तात्रय जोशी वा.दा.ओ. — वामन दाजी ओक वामन पंडित — वामन तानाजी शेषे / वा शेष विठाबाई — विठा रामप्पा नायक विठा रेणुकानंदन — विठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी विठ्ठल केरीकर विठ्ठल नरसिंह साखळकर विठ्ठलदास विठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर विंदा करंदीकर — गोविंद विनायक करंदीकर विनायक/एक मित्र — विनायक जनार्दन करंदीकर विनायक लक्ष्मण बरवे विष्णुदास — कृष्णराव रावजी धांदरफळे विसोबा खेचर विसोबा चाटे विहंगम — बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर वैशाख — त्र्यं.वि. देशमुख विठ्ठल अनंत पिंपळगावकर ( – )

 श शांता शेळके (श्री अवसरे मुळात शान्ताबाईंचे स्नेही होते.)
 शारदाश्रमवासी — पुरुषोत्तम गोपाळ काणेकर 
श्रीकृष्ण — श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर
श्रीधर — श्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर/खडके/देशपांडे
 श्रीराम — श्रीनिवास रामचंद्र बोबडे 

 स 
संजीव — कृष्ण गंगाधर दीक्षित 
सरस्वतीकंठाभरण — दिनकर नानाजी शिंदे
 संजीवनी — संजीवनी मराठे 
सदानंदस्वामी — सदानंद चिंतामणी उपासनी 
साधुदास — गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर 
साने गुरुजी — पांडुरंग सदाशिव साने 
सामराज — शामभट लक्ष्मण आर्वीकर (राजोपध्ये) 
सांवतामाळी — सांवता परसूबा माळी 
सुधांशु — हणमंत नरहर जोशी 
सुमंत — अप्पाराव धुंडिराज मुरतुले 
सुहृद्चंपा — पुरुषोत्तम शिवराम रेगे 
सौमित्र — किशोर कदम
 स्वरूपानंद — रामचंद्र विष्णू गोडबोले 

 ह 
 हरिबुवा — हरिबुवा शिंपी (हरीबोवा केरेश्वर भोंडवे)
 हरिहरमहाराज/उदासी — नीलकंठ रामकृष्ण पाळंदे 
होनाजी — होनाजी सयाजी शेलारखाने 

 ज्ञ
 ज्ञानेश्वर/ज्ञानदेव/माऊली/ज्ञानाबाई/बापरखमादेवीवर/बापविठ्ठलसुत — ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी 

 दत्तप्रसन्न नारायण कारखानीस यांचा जन्म १७ ऑगस्ट १९०८

No comments: