प्यारा हिंदुस्तान माझा प्यारा हिंदुस्ताननव्या जगाच्या नव्या घडीचे एकच आशास्थान
इथे हिमालय, किर्ति हिमासमदिव्य प्रेममय त्यागी जनता येथिल सृष्टिसमान
इथे नद्यांसह प्रीतिरसागम
भव्य सागर नि जन पुरुषोत्तम
रक्तपिपासू न ही संस्कृतीसकल जगाला मानवतेचे देई पाठ महान
वृकव्याघ्रांसम नसे प्रकृती
मानव्याची मूर्त आकृती
येथे अकबर, येथ शिवाजीएकी, शांती, त्याग नि प्रीती यांची माणिकखाण
कबीर, तुलसी, एकनाथजी
बुद्ध, प्रबुद्ध नि शुद्ध गांधिजी
आज भारतीं जे जे लढतीबलशाली परि करिल भारता हे त्यांचे बलिदान
जे जे पिचती, झिजती, रडती
पिळले जाती, छळले जाती
परकीयांच्या पाशामधुनीदलित नि शोषित सारे गातिल स्वातंत्र्याचे गान
विमुक्त झाली अपुली जननी
मुक्त करिल ही अवघी अवनी
— वसंत बापट
No comments:
Post a Comment