 |
| चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव |
हे डाळिंबाचे दाणे वे
ड्या l घात तुझा करिती
ll ध्रुo ll
कवटी तूं कवठावरली
फोडिलीस एका काळीं
ती चोंच आज बोथटली
करितोस गुजारा धनी टाकितो त्या तुक
ड्यांवरती
ll १ ll
मालक तव हौशी फार
करि माया जरि अनिवार
कुरवाळी वारंवार
तूं पाळिंव पोपट त्याचा म्हणुनी तुच्छ तुला गणिती
ll २ ll
चैनींत घेत गिरक्यांसी
स्वच्छंदें वनिं फिरलासी
गगनांत स्वैर उडलासी
ते स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठव तूं चित्तीं
ll ३ ll
चाहिल तें झाड बघावें
त्यावरी स्वैर उतरावें
फळ दिसेल तें फोडावें
मग उडुनी जावें खुशाल, असली तेव्हांची रीती
ll ४ ll
कितितरी फळें पाडाचीं
चोंचीनें फोडायाचीं
हि लीला तव नित्त्याची
पिंज
ऱ्यांत अडकुनि आयुष्याची झाली तव माती
ll ५ ll
पूर्वीची हिंमत गेली
स्वत्वाची ओळख नुरली
नादान वृत्ति तव झाली
करितोस धन्याची 'हांजी हांजी' तूं पोटासाठीं
ll ६ ll
येतांच धनी नाचावें
नाचत त्या सत्कारावें
तो वदेल तें बोलावें
तेव्हांच टाकितो मालक दाणे असले तुजपुढतीं
ll ७ ll
हे दाणे दिसती छान
जरि लाल आणि रसपूर्ण
त्याज्य ते विषासम जाण
पिंज
ऱ्यांत मिळती म्हणुनि तयांची मुळिं नाही महती
ll ८ ll
हा अध:पात तव झाला
डाळिंबचि कारण याला
भुलुनियां अशा तुकड्यांला
पिंज
ऱ्यांत मेले किती अभागी पोपट या जगतीं
ll ९ ll
— काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)

टिप :पाठ्यपुस्तकात सातच कडवी आहेत