आकाश अंगणी रांगत आला
शीण तान्हुल्या भारीच झाला
पाळण्यामध्ये बाळ घातला
सृष्टी माऊली लागे गायाला... जो बाळा जो जो रे जो ||
बाई गं माझं बाळ गुणाच
रांगत होतं तरी केव्हाच
लाल दिसती डोळे झोपेचे
निज रे बाळा निज सुखाने... जो बाळा जो जो रे जो ||
निशामातेच्या अंकी निजाया
केव्हाच गेला दिवस राया
जागून जागून तापली काया
नीज रे बाळा, नीज राजसा... जो बाळा जो जो रे जो ||
आनंदकंदा जगतधारा
नीज सुखाने नीज वासरा
पहाट होता जाई माघारा
नीज रे बाळा, नीज भास्करा... जो बाळा जो जो रे जो ||
– 'दत्त' (दत्तात्रय कोंडो घाटे)
शीण तान्हुल्या भारीच झाला
पाळण्यामध्ये बाळ घातला
सृष्टी माऊली लागे गायाला... जो बाळा जो जो रे जो ||
बाई गं माझं बाळ गुणाच
रांगत होतं तरी केव्हाच
लाल दिसती डोळे झोपेचे
निज रे बाळा निज सुखाने... जो बाळा जो जो रे जो ||
निशामातेच्या अंकी निजाया
केव्हाच गेला दिवस राया
जागून जागून तापली काया
नीज रे बाळा, नीज राजसा... जो बाळा जो जो रे जो ||
आनंदकंदा जगतधारा
नीज सुखाने नीज वासरा
पहाट होता जाई माघारा
नीज रे बाळा, नीज भास्करा... जो बाळा जो जो रे जो ||
– 'दत्त' (दत्तात्रय कोंडो घाटे)
हे अंगाईगीत श्रीमान जागृत आणि श्रीमती संध्या व्यापारी यांच्या मदतीने पूर्ण झाले. संकलक श्री जागृत आणि श्रीमती संध्या व्यापारी यांचा आभारी आहे.
4 comments:
बाई गं माझं बाळ गुणाच
रांगत होत तरी केव्हाच
लाल दिसती डोळे झोपेचे
नीज रे बाळा नीज सुखाने
जो जो रे जो जो ||
आकाश अंगणी रांगत आला
शीण तान्हुल्या भारीच झाला
पाळण्या मध्ये बाळ घातला
सृष्टी माऊली लागे गायाला
जो जो रे जो जो ||
निशा मातेच्या अंकी निजाया
केव्हाच गेला दिवस राया
जागून जागून तापली काया
नीज रे बाळा नीज भास्करा
जो जो रे जो जो ||
अनंदकंदा जगतधारा
नीज सुखाने नीज वासरा
पहाट होता जाई माघारा
नीज रे बाळा नीज चंद्रमा
जो जो रे जो जो ||
Thanks Jagrut.
या कवितेचा कर्ता 'अज्ञात' म्हटला आहे. प्रत्यक्षात ही कविता 'दत्त' ऊर्फ कै. दत्तात्रेय कोंडो घाटे यांची आहे. द. कों. घाटे हे प्रसिद्ध साहित्यिक वि.द. घाटे यांचे वडील होते.
तिसऱ्या कडव्यात शेवटची ओळ, ' नीज रे बाळा, नीज राजसा' आणि चौथ्या कडव्यात
शेवटची ओळ, 'नीज रे बाळा, नीज भास्करा' अशी असल्याचं आठवतंय.
कविता सूर्याला अनुलक्षून असल्याने, 'चंद्रमा' कसं असेल ?
Post a Comment