तांबियाचे नाणे न चाले खर्या मोले l जरि हिंडविले देशोदेशी ll
करणीचे काही न मने सज्जना l यावे लागे मना वृद्धांचिया ll
हिरियासारिखा दिसे शिरगोळ l पारखी ते डोळा न पाहती ll
देउनिया भिंग कमाविले मोती l पारखिया हाती घेता नये ll
तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ l आपुले हे चित्त आपणा ग्वाही ll
— संत तुकाराम
No comments:
Post a Comment