मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास l असे ज्यांचा त्यास नसे ठावा ll
भाग्यवंती घेती वेंचूनियां मोलें l भारवाही मेले वाहतां ओझें ll
चंद्रामृतें तृप्ति पारणें चकोरा l भ्रमरासी चारा सुगंधाचा ll
अधिकारी येथें घेती हातवटी l परीक्षवंता दृष्टी रत्न जैसें ll
तुका म्हणे काय अंधळिया हातीं l दिलें जैसें मोतीं वायां जाय ll
— संत तुकाराम
No comments:
Post a Comment