पाखरांनो, तुम्हांलाही आता याची सवय झाली असेल…
स्वच्छ, निळ्या आकाशात रोज सकाळी
सायरनचे सूर पसरतात, त्या वेळी
तुम्ही कुठे असता ?
हवेत चढत जातात त्या सुरांची उंच, उंच कंपने
तुमच्यासारखीच…. तेव्हा तुम्ही कुठे जाता ?
समजतात तुम्हांला हे धोक्याचे इशारे
नि नंतरचे उतरत्या सुरांतले
'ऑल क्लिअर' चे दिलासे…
—युद्ध्यमान जीवनसंघर्षाची आमची हि रोजची तालीम…
पांखरांनो तुम्ही काय करता ?
…आम्ही आमची घड्याळे लावतो,
आणि कामाला जायला
किती वेळ आहे याचा अंदाज घेतो !
पाखरांनो, तुम्ही ……
— रमेश अच्युत तेंडुलकर
(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

No comments:
Post a Comment