अखंड - २
सत्याविण नाहीं धर्म तो रोकडा l
जनांशीं वांकडा l मतभेद ll १ ll
सत्य सोडूं जातां वादामध्यें पडे l
बुद्वीस वांकडे l जन्मभर ll २ ll
सत्य तोच धर्म करावा कायम l
मानवा आराम l सर्व ठायीं ll ३ ll
मानवाचा धर्म सत्य हीच नीती l
बाकीची कुनीती l जोती म्हणे ll ४ ll
— महात्मा जोतीराव फुले (जोतीराव गोविंदराव फुले)
जनांशीं वांकडा l मतभेद ll १ ll
सत्य सोडूं जातां वादामध्यें पडे l
बुद्वीस वांकडे l जन्मभर ll २ ll
सत्य तोच धर्म करावा कायम l
मानवा आराम l सर्व ठायीं ll ३ ll
मानवाचा धर्म सत्य हीच नीती l
बाकीची कुनीती l जोती म्हणे ll ४ ll
— महात्मा जोतीराव फुले (जोतीराव गोविंदराव फुले)
No comments:
Post a Comment