विटीदांडूचा खेळ मजेदार
धूम चालुनियां लोटली बहार
गुंग झालेला बाळ खेळण्यांत
एक बाई मोटारींतुनि पहात II १ II
बघाया त्या गुटगुटित बालकास
झणीं थांबवि आपुल्या मोटारीस
तोंच मुलगा मोटारीवर चढून
म्हणे 'गाडी कां दिली थांबवून' ? II २ II
'तुला न्याया ही थांबविली पाहीं
झणीं बाबांना विचारून येईं'
'आई म्हणते, बाबांस असे नेलें
वरी देवानें त्यांस बोलाविलें' II ३ II
'बरें, जाउनियां कोट तुझा आण.'
'आई आहे शिवणार हो अजून.'
'बरें, चल तूं ऐसाच मोटारींत
घरीं अमुच्या देईन तुला कोट II ४ II
खेळ, खाऊ देईन तिथें राहीं '
बाळं उतरे मोटारीवरुनीही.
'घरीं अमुच्या कां सांग येत नाहीं' ?
'तिथें माझी असणार नाहीं आई' ! II ५ II
- वा. गो. मायदेव
धूम चालुनियां लोटली बहार
गुंग झालेला बाळ खेळण्यांत
एक बाई मोटारींतुनि पहात II १ II
बघाया त्या गुटगुटित बालकास
झणीं थांबवि आपुल्या मोटारीस
तोंच मुलगा मोटारीवर चढून
म्हणे 'गाडी कां दिली थांबवून' ? II २ II
'तुला न्याया ही थांबविली पाहीं
झणीं बाबांना विचारून येईं'
'आई म्हणते, बाबांस असे नेलें
वरी देवानें त्यांस बोलाविलें' II ३ II
'बरें, जाउनियां कोट तुझा आण.'
'आई आहे शिवणार हो अजून.'
'बरें, चल तूं ऐसाच मोटारींत
घरीं अमुच्या देईन तुला कोट II ४ II
खेळ, खाऊ देईन तिथें राहीं '
बाळं उतरे मोटारीवरुनीही.
'घरीं अमुच्या कां सांग येत नाहीं' ?
'तिथें माझी असणार नाहीं आई' ! II ५ II
- वा. गो. मायदेव
10 comments:
साहेब धन्यवाद खूप वर्षांपासून ही कविता शोधत होतो
अतिउच्च...
ही कविता वडिलांना इ. 4थी ला होती, आज वडिलांचं वय 72 वर्षे आहेत आणि अजूनही वडिलांची कविता पाठ आहे, मलाही आज ही कविता वाचुन आणि त्यातील अलंकारिक भाषा वाचू न आनंद झाला.
खुप सुंदर जुनी कविता, चाल कोणत्या वृत्तात आ
हे?
माझ्या वडिलांना ४ला होती ही कविता त्यांना चाल माहीत आहे मी लहान पणी दररोज ऐकत होतो ९५९५६१७४१४
वा.. वाचून मजा आली.. माझ्या वडिलांची पण ही कविता तोंडपाठ आहे व घरगुती प्रत्येक कार्यक्रमात आमचा आग्रह असतो ती म्हणायचा.. फार निरागस संवाद आहे हा.. डोळ्यात पणी उभे राहते
dhanyawad
माझे वडील ही कविता आम्हा भावंडाना साठी कायम गात असत ते आता 71 वर्षी आम्हास सोडून देवा घरी गेले आहेत.आम्ही,सदर कविता त्याच्या सुमधूर आवाजात ऐकण्यास पोरके झालो
माझ्या आजीने मला लहानपणी ही कविता ऐकवली होती. आजी कविता खूप छान सुरेल आवाजात गाऊन दाखवायची. नकळत आम्हां सर्वांच्या डोळ्यांत पाणी उभे राहायचे. आजीला जाऊन 15वर्षे झाली, आज ही कविता वाचताना मला तिचेच शब्द कानावर पडल्याचा भास होतोय.
माझ्या आजीने मला लहानपणी ही कविता ऐकवली होती. आजी कविता खूप छान सुरेल आवाजात गाऊन दाखवायची. नकळत आम्हां सर्वांच्या डोळ्यांत पाणी उभे राहायचे. आजीला जाऊन 15वर्षे झाली, आज ही कविता वाचताना मला तिचेच शब्द कानावर पडल्याचा भास होतोय.
Post a Comment