ती पहा, ती पहा, बापुजींची प्राणज्योती
तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहती
झुंजला राजासवे हा, रंगला रंकासवे हा
पेटता देहेही आता, दिव्यता दावून जाती
चंदनाचे खोड लाजे, हा झिजे त्याहूनही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडताती
पृथ्वीच्या अक्षांशि लाली, पृथ्विच्या रेखांशि लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या, दशदिशांना कापताती
नाव ज्याचे ऐकुनीया थरकली सिंहासने
ना जरी तलवार हाती, हा अहिंसेचा पुजारी
सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवे हा
मृत्युच्या अंतीम वेळी, नाम रामाचे मुखी
सिंधु गंगा आणि यमुना, धन्य झाली अस्थिनी
राख तूझी भारताच्या, तिलक झाली रे ललाटी
- मनमोहन नातू
मनमोहन यांनी ही कविता गांधीहत्येनंतर लिहिली असे पाठय़पुस्तकात अभ्यासल्याचे अनेकांना आठवत असेल. पण या कवितेमागे एक किस्सा असा आहे कि;
गरज पडेपर्यंत निश्चिंत राहायचे आणि गरज पडली की ती भागविण्यासाठी उपाय शोधायचे, हा मनमोहनांचा खाक्या. असेच एकदा कविराज नेहमीप्रमाणे आर्थिक संकटात सापडल्यावर आपल्या काही कविता घेऊन 'हिज मास्टर्स व्हॉइस’च्या ध्वनीमुद्रकेसाठी गाणार्या गायकाकडे गेले. गायकांनी त्यांच्या कविता पाहिल्यादेखील नाहीत. ‘तुम्हाला किती पैसे हवे आहेत?’ त्यांनी विचारले. ‘फक्त एका आठवडय़ापुरत्या रेशनसाठी साडेसात रुपये हवे आहेत. त्यावर एक पैसादेखील नको.’
गायक त्यांना म्हणाले, ‘मला तुमच्या प्रेमाबिमाच्या कविता नकोत. घरी जाऊन निवांतपणे गांधीजींवर (नुकतीच गांधीहत्या झाली होती) एक कविता लिहा. गांधीजींवर चांगली कविता लिहिलीत तर दुप्पट म्हणजे पंधरा रुपये देईन. मनमोहन लगेच म्हणाले, ‘घरी कशाला जायला पाहिजे? आत्ता इथेच लिहून देतो.’ जवळच बसलेल्या गायकाच्या मुलीच्या पेन्सिलीने त्यांनी भराभर कविता लिहिली.
ती पहा, ती पहा । बापूजींची प्राणज्योती ।
तारकांच्या सुमनमाला । देव त्यांना वाहताती ll
गायकांने लगेच त्यांना रोख पंधरा रुपये दिले आणि या कवितेचे सर्व हक्क तोंडीच घेऊन टाकले. पुढे पाठय़पुस्तकात ही कविता घेतली गेली. कवितेची ध्वनिमुद्रिका प्रचंड खपली. या गाण्याने रेकॉर्ड ब्रेक केले. गायकाने आणि रेकॉर्डच्या विक्रेत्याने त्यावर हजारो रुपये कमावले. पण कवीला मात्र मिळाले होते फक्त पंधरा रुपये! पण त्याबद्दल त्यांना यत्किंचीतही दु:ख झाले नाही. किंबहुना त्या दिवशीची त्यांची रेशनची गरज भागली, याबद्दल त्यांना कृतज्ञताच वाटली.
(संदर्भ : लोकरंग - ऑगष्ट २०११)

1 comment:
कविता छान पन्नास वर्षांपूर्वी च्या शालेय जीवनात घेऊन गेली. तसेच कवी बद्दल लिहिलेला किस्सा, हाडाच्या कवीला शोभेल असाच आहे. 🙏
Post a Comment