तापीकाठची चिकण माती,
ओटा तरी बांधू गं बाई.असा ओटा चांगला तर,
जातं तरी मांडू गं बाई.असं जातं चांगलं तर,
सोजी तरी दळू गं बाई.अशी सोजी चांगली तर,
लाडू तरी बांधू गं बाई.असे लाडू चांगले तर,
शेल्याच्या पदरी बांधू गं बाई.असा शेला चांगला तर,
भाऊराया भेटू गं बाई.असा भाऊ चांगला तर,
दारी रथ आणील गं बाई.असा रथ चांगला तर,
नंदी तरी जुंपिन गं बाई.असा नंदी चांगला तर,
माहेराला जाऊ गं बाई.असं माहेर चांगलं तर,
धिंगामस्ती करू गं बाई !
- सदाशिव माळी


