वाटोळें सरळें मोकळें l | वोतलें मसीचें काळें ll |
कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळे l | मुक्तमाळा जैशा ll |
अक्षरमात्र तितुकें नीट l | नेमस्त पैस काने नीट ll |
आडव्या मात्रा त्याहि नीट l | आर्कुली वेलांट्या ll |
पहिले अक्षर जे काढिलें l | ग्रंथ संपेतो पाहात गेलें ll |
येका टांकेंचि लिहिले l | ऐसे वाटे ll |
अक्षरांचे काळेपण l | टांकांचें ठोसरपण ll |
तैसेंचि वळण वांकण l | सारिखेंची ll |
वोळीस वोळ लागेना l | आर्कुली मात्रा भेदीना ll |
खालिले वोळीस स्पर्शेना l | अथवा लंबाक्षर ll |
पान शिषानें रेखाटावें l | त्यावरी नेमकेचि ल्याहावें |
दुरी जवळी न व्हावे l | अंतर वोळीचें ll |
कोठे शोधासी अडेना l | चुकीं पाहता सापडेना ll |
गरज केली हे घडेना l | लेखकापासुनी ll |
ज्याचे वय आहे नूतन l | त्यानें ल्याहावें जपोन ll |
जनासी पडे मोहन l | ऐसें करावें ll |
भोंवतें स्थळ सोडून द्यावे l | मध्येंचि चमचमित ल्याहावें ll |
कागद झडतांहि झडावें l | नलगेचि अक्षर ll |
— संत रामदास
मसी = शाई; वोळी = ओळी; ढाळ = आकार; मुक्तमाळा = मोत्यांच्या माळा; पैस= जागा
No comments:
Post a Comment