शेजीबाईचा कोंबडा
आला माझ्या दारी.
घालीन कोंडा
पाजीन पाणी.
शेजीबाईची बकरी
आली माझ्या दारी.
घालीन पाला
पाजीन पाणी.
शेजीबाईचा बैल
आला माझ्या दारी.
घालीन चारा
पाजीन पाणी.
शेजीबाईचा बाळ
आला माझ्या घरी.
देईन खाऊ
पाजीन पाणी.
– अज्ञात
A NON-PROFIT
रम्य ते बालपण!
साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!
सुचना:
येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.
ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.
कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
28 October 2025
आला माझ्या घरी
13 October 2025
सहा ऋतू
झुळझुळ वारे वाहु लागले,
लाल पालवी तरूंवरी.
फळाफुलांनी लवल्या वेली,
आंबेराई मोहरली.
आभाळाचे निळेनिळेपण,
कुहू कुहू कोकीळा करी.
आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी !
ग्रीष्म पातला, सूर्य तापला,
ऊन कडक जिकडे तिकडे.
खूप तापते जमीन, तिजवर
जागोजागी पडती तडे.
गपचीप झाली सर्व पाखरे
छाये खाली लपती गुरे
गरम झळ्यांच्या ऐन दुपारी ऊन्हात खेळू नका बरे !
वारे सुटले, मेघ उसळले,
गडगडती ते आभाळी !
वीज कडकडे लखलख करूनी,
सर सर सर वर्षा आली.
सुटे मातीचा वास चहुंकडे,
हिरवेहिरवे गार दिसे
कागद-होड्या सोडायची पावसात किती मौज असे !
शरद येई, अन् मेघ पळाले
गुबगुबीत जणु पळति ससे !
कुरणे हिरवीगार चहुंकडे,
हिरवे हिरवे मळे तसे.
हिरवी झाडे, हिरवी शेते,
तुडुंब भरले तळे निळे.
चांदण्यात अन बागडण्याची हौस सारखी मनी उसळे
हेमंताचे दिवस पातले,
भरे हुडहुडी अंगात.
शेतकऱ्याची गोफण फिरते
गरगर भरल्या शेतात.
हवेहवेसे ऊन वाटते,
अंगणात आजी बसते
शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते !
उदासवाणा शिशिर ऋतू ये,
पाने पिवळी पडतात.
सोसाट्याच्या वाऱ्यासंगे
झर झर झर झर गळतात
झडून पाने झाडे सारी
केविलवाणी दिसतात.
दिसें तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास !
सहा ऋतूंचे चाक फिरतसे,
शिशिर ऋतूही जाईल हां
वसंत सांगे ‘मीही येतो'
हळूच मागोमाग पाहा !
– अज्ञात
29 January 2022
सृष्टीची करमणुकीची घटना
होता मात्र तदा जगज्जनक तो, हा काळ होता कुठे
कोणी, कांही, कुठे, कधीही नव्हते, तेंव्हा जगन्नायक
ईच्छा साधन घेऊनि बनविता झाला महापुस्तक II १ II
कोरे पुस्तक निर्मिले प्रथम ते आकाश ज्या बोलती
नाना तारकपुंज त्यात लिहिले, त्यांची न कोणा मिती
तेथे काढियली यथाक्रम तरु, पक्षी, पशु माणसे
होवो हे म्हणताच ते उमटले जागी जसेच्या तसे II २ II
झाले पुस्तक पूर्ण विश्व म्हणतो ज्याला इथे आपण
वाचाया बसला प्रभू उलटी तो पाने स्वयें वाचून
त्याने आजवरी किती उलटलि पाने तया ठाऊक
जाणे तोच पुढिल उरली पाने किती आणिक II ३ II
जन्मापासून पाहिली वरिवरि तेवीस पाने पुरी
कोणा माहित आणखी कितीतरी पाहीन ह्या भूवरी
दृष्टीदेखत आज पान सरले, आले नवे बाहिर
जाणू काय अम्ही शुभाशुभ किती पाहिलं तो यावर II ४ II
— अज्ञात
29 January 2021
भाताचा हंगाम
तयार व्हा रे करू कापणी
पहांट होता जाउं चला रे
पचंग बांधुनि तयार व्हा रे
खसाखसा मग विळा चालवा
चूड कापुनि घाला आडवा
चूडावरती चूड ठेवुनी
कडपें बनवा, खपा कसूनी
कापा ! कापा ! झटुनी सारे
कडपांचे मग बांधू भारे
उचलुनि डोकीवर ते घेउं
चला खळ्यावर झप झप जाउं
एकावरती दुसरा चढवा
भार्यांची ह्या उडवी बनवा
सांठवणी हि आज संपली
पुढे झोडणी करणें आली
देवाजीच्या नांवा घेतां
बरकत येते बहुतची भाता
झोडा भारे खळें भरेल
भाताची मग रास पडेल
शाबास तुमची ! भले बहादर !
काम उडवुनी द्याच भराभर
भाताची ही रास पडतसे
माचुंड्यांचा ढीग होतसे
घ्या घ्या आतां हाती सुपाला
वारा वाहे वारवण्याला
पाळींज, कचरा उडुनी जाई
निवळ खालती भातच राही
मोजुनि ते कणग्यांत सांठवा
देवाचे उपकार आठवा
26 November 2018
मधमाशी
[अंजनी गीत]
उठुनि सकाळीं ती मधमाशी
जाते कीं मध मिळवायासी
थेंबें थेंबें सांठवि त्यासी
आळस तिजला ठाऊक नाहींउद्योगी मोठी ।। १ ।।
सर्व दिवस ती खपते पाहीं
थंडी ऊन म्हणेना कांहीं
गोड गोड मध निपटुनि घेतेउद्योगी मोठी ।। २ ।।
थोडा म्हणुनी मुळीं न रूसते
सांठवुनी तो जपुनि ठेविते
थोडाही गुण मिळतां घ्यावाउद्योगी मोठी ।। ३ ।।
सांठा त्याचा नित्य करावा
कोणालाही तो शिकवावा
ठेवा हें चित्तीं ।। ४ ।।
— अज्ञात
3 July 2018
केळीच्या बागा मामाच्या
घडावर घड धाडायचा.
आक्का मोठी हौसेची
भरपूर केळी सोलायची.
आत्या मोठ्या हाताची
तिनेच साखर लोटायची.
आजी आमची मायेची
सायच साय ओतायची.
ताई नीटस कामाची
जपून शिकरण ढवळायची.
आई आग्रह करायची
पुरे पुरे तरि वाढायची.
वाटिवर वाटी संपवायची
मामाला ढेकर पोचवायची.
— अज्ञात

