जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता ।
जय लोकनायक थोर ते ।
जय क्रांतिकारक वीर ते ।
जय भक्त ते, रणधीर ते ।
जय आमुची स्वाधीनता ।
तेजोनिधी हे भास्करा ।
प्रिय पर्वता, प्रिय सागरा ।
तरूवृक्ष हो, हे अंबरा ।
परते पहा परतंत्रता ।
बलिदान जे रणि जाहले ।
यज्ञात जे धन अर्पिले ।
शतकांत जे हृदयी फुले ।
उदयाचली हो सांगता ।
ध्वज नीलमंडळ हो उभा ।
गतकाल हा वितरी प्रभा ।
भवितव्य हे उजळी नभा ।
दलितांस हा नित् तारता । जय भारता, जय भारता ।
No comments:
Post a Comment