फिटेल कैसें ऋण ?

वाढविलें निशिदिन;ना कळे, फिटेल कधिं हें ऋण ? ll ध्रु llवाळवंटिंचें रखरखतें उन्ह
मजस्तव हांसत माथां झेलुन
पोटीं ज्यांनीं मज कवटाळुन
तयांचे, फिटेल कैसें ऋण ? ll १ ll
गुंफुनियां कर नित माझ्या करिंकरित पाठराखण;
संगे येती कुणि छायेपरि
घरी, संगरीं, राजमंदिरीं—
दिलें कुणीं प्रभुपण;तयांचें, फिटेल कैसें ऋण ? ll २ ll
विसरुनि अवगुणआपुलकीनें
थोरपणाचें चढवुनि लेणें
शिलाच मी, परि मज प्रेमानें
उभे सखे, सज्जन;तयांचे, फिटेल कैसें ऋण ? ll ३ ll
मंथुनियां रससागर कोणी
मज पाजियली अमृतवाणी,
नवज्ञानांच्या उघडुनि खाणी—
दिलें तेज पसरुन;तयांचें, फिटेल कैसें ऋण ? ll ४ ll
— आणि, उदात्तासाठीं ज्यांनीं
जीवन ज्योतीपरी जाळुनी
अंधारीं कधिं जातां बुडुनी
तेंच मला भूषण;ततयांचें, फिटेल कैसें ऋण ? ll ५ ll
सातवार व शतदां जन्मुन
फिटायचें का ऋण हें हातुन ?
आनंदानें माथां वाहिन
ना कळे, फिटेल कैसें ऋण ? ll ६ ll

— वि. म. कुलकर्णी