[अक्रूर ]
मज दीनेची, कींव येउं द्या कांहीं
घाला हो भिक्षा माई ! ।। ध्रु .।।
हें ऊन किती, कडक तापतें बाई
या तीन दिसांपासून खाया कांहींअंगाची फुटते लाही
मी किती तरी, फिरलें दारोदारशीतही मिळालें नाहीं
घेउनी कडेवर पोर
कंठात गुंतले प्राणकांहींच बरें, आतां उरलें नाहीं
जाहला जीव हैराण
भीक मागण्याला त्राण
घाला हो भिक्षा माई ! ।। १ ।।
ज्या दिवशीं हें, कुंकूं माझें पुसलें
दो महिन्यांचे, सवें घेउनी बाळमज अभाळ उघडें पडलें
मी आजवरी, वांचविलें बाळालावणवणलें रानोमाळ
तिळतीळ तुटे, माझें काळिज बाईचिंचेचा खाउन पालापण अतां फुटेना पान्हा
वांचवा लाडका तान्हा
देखवे न याची दैना
घाला हो भिक्षा माई ! ।। २ ।।
दो दिवसांचा, शिळा वाळला तुकडा
तो चावुनियां, बाळाला भरवीनचालेल अम्हांला वाढा
कां माई हो, अशा लावितां दार ?मांडीवर मग निजवीन
चल, भीक अतां, आपण मागायालानाहीं मी पुन्हां येणारबाळा, चल, पुढतीं जाऊं
केविलवाणें नच पाहूं
हा मुकाच घे तुज खाऊ
देवाच्या जाउं घराला. ।। ३ ।।
No comments:
Post a Comment