मे महिन्याची दुपार ... रणरणते उन्ह
झगमगता सूर्य आभाळामधून
जाई फुलासारखी नाजुक पोर
घेउन निघाली बापाला भाकर
गिरणीचा भोंगा आत्ता होईल
दमलेला बाप फाटकात येईल
उशिर झाला म्हणून रागवेल काय ?
झप-झप चाललेत नाजुक पाय.
घरचे सगळेच तिनेच केले
आजारी आईला औषध दिले
धाकट्या भावाची घेतली शिकवणी
पाठच्या बहिणीची घातली वेणी
येईल तसा शिजवला भात
तापलेल्या तव्याने पोळले हात
तरीपण डोळ्यात पाणी नाही
आईचीच आज ती होती आई
डोळे भरुन पाहत होती माय
झप-झप चाललेत नाजुक पाय.
माथ्यावर उन्ह ... पायाखाली उन्ह
परिस्थितीचे मनात उन्ह
निखार्यात तापलेल्या धरणीमाये
पोरीचे पाऊल कमळाचे आहे
तिच्या पावलाखाली चंदन हो
माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो
अरे, तिच्या डोळ्यातली भिती पाहा
घड्याळा थोडेसे मागे रहा
बापासाठी लेक ओढीने जाय
झप-झप चाललेत नाजुक पाय !
झगमगता सूर्य आभाळामधून
जाई फुलासारखी नाजुक पोर
घेउन निघाली बापाला भाकर
गिरणीचा भोंगा आत्ता होईल
दमलेला बाप फाटकात येईल
उशिर झाला म्हणून रागवेल काय ?
झप-झप चाललेत नाजुक पाय.
घरचे सगळेच तिनेच केले
आजारी आईला औषध दिले
धाकट्या भावाची घेतली शिकवणी
पाठच्या बहिणीची घातली वेणी
येईल तसा शिजवला भात
तापलेल्या तव्याने पोळले हात
तरीपण डोळ्यात पाणी नाही
आईचीच आज ती होती आई
डोळे भरुन पाहत होती माय
झप-झप चाललेत नाजुक पाय.
माथ्यावर उन्ह ... पायाखाली उन्ह
परिस्थितीचे मनात उन्ह
निखार्यात तापलेल्या धरणीमाये
पोरीचे पाऊल कमळाचे आहे
तिच्या पावलाखाली चंदन हो
माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो
अरे, तिच्या डोळ्यातली भिती पाहा
घड्याळा थोडेसे मागे रहा
बापासाठी लेक ओढीने जाय
झप-झप चाललेत नाजुक पाय !
— दत्ता हलसगीकर
संकल्पना : श्रीयुत दिनेश कासवेद, पुणे.
19 comments:
आज प्रथमच वाचली ही कविता, आणि फार आवडली!
very nice
khup sundar ..shalet astana vachali hoti ...aata aathvali ..dhanywad
अतिशय सुंदर कविता👍
काही जुने पाठ ही आहेत ते ही ऊपल्ध करावेत, युवक भारती 1999
धन्यवाद
अप्रतिम कविता आहे.आम्हाला ही कविता होती पण नेमका वर्ग आठवत नाही.सर्व वर्ग रडला होता.कवितेच्या शब्दांनी आणि गुरुजींच्या शिकवन्याने
हृदयाला भिडणारी कविता
काही गावात अजूनही लहान मुलींवर एवढी मोठी जबाबदारी पडते..
अनेक वर्षानी ही कविता वाचली...शाळेचे दिवस आठवले
1994मध्ये मी चौथीला असतांना ही छान कविता होती.
अजूनही तो दिवस आठवतो त्या दिवशी सरांनी ही कविता
शिकवली.धन्यवाद सर..
आज ही कविता मनात ताजी आहे.....खूप छान
मनाला भिडणारी खूपच सुंदर कविता
खूपच छान कविता आहे ही 👌👌
किती दिवसांनी वाचली पण खरच आज ही कविता मनात ताजी आहे.
Thank you.
मी चौथीला असतांना ही छान कविता होती.
अजूनही तो दिवस आठवतो ज्या दिवशी ही कविता
शिकवली.
मी अशी वाचलेली...
मे महिन्याची दुपार ... रणरणते ऊन ... झगमगता सुर्य आभाळामधून ...
बाकी same
छान कविता आहे , लहान बहिणीच्या अभ्यासक्रम मध्ये हो तेंव्हा खुप आवडली आणि पाठ सुध्दा झाली , आज सहज आठवली परंतु पूर्ण आठवेना म्हणून सर्च केली आणि सापडली छान वाटले
मी ही कविता शिकवलीय. इयत्ता पाचवीला.विद्यार्थ्यांना प्रचंड आवडायची ही कविता.
परंतु मला सुरुवात आठवते ती अशी
मे महिन्याची दुपार
रणरणत उन्ह
झगमगता सूर्य आभाळामधून
आज त्याहीपेक्षा कडक उन्हाळा असतो,कूठेतरी कूणीतरी पोर आजारी आईसाठी धडपडत असेल ,तेच कमळाचे पाय कूठेतरी रस्त्यावरच्या दगडफोडीसाठी ,ऊसतोडीसाठी भाजत असतील,गिरणीचा भोंगा कूठे राहीला नाही पण कूणा बिगारीच्या परीस्थीतीचा वाजलेला भोंगा आजही आकंठ घोंगावतच आहे हिच आणी काहीशी अशीच गरिबीची झळ आजही वस्त्यामधे रणरणत आहे ..हे सगळं तेव्हाही तसच होतं आजही तसंच आहे..श्रीमंत श्रीमंतच होत राहीले आणी गरीबांची गरीबी पीढीजातच राहीली..तेव्हा ऐन ऊन्त्राळ्याच्या झळ्यांमधे ही कवीता शिकताना आमच्या आगाशे बाईंनी एवढी सूंदर प्रस्तावना केली होती कि,वर्गात नूसते हूंदके फूसफूसण्याचे आवाज येत होते..सतत एकांतात कवीता वाचून वाचून आजही ती तोंडपाठच आहे..खरच ती गरीब मूलगी कोण असावी बरं याची उत्सूकता हौती,तीला मदत करावीशी वाटायचे,कवीतेला भावना असतात हे पटायला लागायच्या वयाच्या आधीच मनात घर करून या कवीतेतले भाव...अप्रतीम सत्य परीस्थीती दत्ता हलसगीकर सरांनी मांडलीय..करावे तेवढे कौतूक कमीच असेल..!!!!
खुपच सुंदर कविता आहे. शाळेत असताना वाचली होती.परत ती वाचायला मिळाली आणि शाळेतल्या दिवसाची आठवण झाली. धन्यवाद
मला लहानपणी शाळेत असताना बालभारती पुस्तकात ही कविता होती.तोंडपाठ होती.छान कविता. परिस्थितीचे वास्तवदर्शी चित्रण.खूप छान आवडती कविता.
Very nice...
Nice article along with poems Visit YouFestive Our Culture India Many thanks.
Post a Comment