रजनीचें अवगुंठन पडलें साऱ्या विश्वावरी
दाटले मेघहि गगनोदरीं. ध्रुo
सोडून गांव ही उंच इमारत जुनी
किति किर्र रान हें माजे चौ बाजुंनीं !
खळखळा वाहते मधेंच जलवाहिनी;
पिसाट वारा तरुपर्णांतुन फिरुनी भय दाखवी,
आवाजामधिं मेघगर्जना, नयनीं विद्धुल्लता,माजली भेसुर कोल्हेकुई ! १
या स्थळींच करती भय्याजी पाहरा.
पिळदार मिशांनीं उग्र दिसे चेहरा.
ध्वज शुभ्र फडकवी वदनावरतीं जरा.कंदिल घेउन दंडा फिरवित भय्याजी चालती,देह हा पोलादी तत्वतां. २
अंगात कोपरी, कसलेलें धोतर,
मल्मली चिमुकली टोपी डोक्यावर,
पायांत वाजती चढाव ते करकर,
कोस शेकडों दूर राहिलीं दयिता अन् बालकेंहादरे भूमि तयांभोंवतीं ! ३
कधिं तुलसीजींची चौपाई गाउनी,
कधिं गोड बांसरी मौजेनें छेडुनी
ते दिवस कंठिती जीवाला रिझवुनी.
दोन आंसवें भय्याजींच्या पडती नेत्रांतुनीत्यामुळें सुख झालें पारखें. ४
अन् सुहृदांची त्या स्मृति होतां कधिंतरी
ते उदासवाणे बसती कोठेंतरी;
नि:श्वास सोडती टक लावुनि अंबरीं.येति मग भानावरतीं झणीं. ५
— गोपीनाथ
No comments:
Post a Comment