प्रभावशाली परममंगला महाराष्ट्र देशा
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा IIधुII
सह्याद्रिच्या सहस्र शिखरीं उन्नत झालेला
गोदा कृष्णा भीमा ह्यांनी पुनीत केलेला
पश्चिम सिंधु बंधु पाठिशी पूर्वोदधि जामात
विंध्याद्रीची ऊंची लक्षी सातपुडा प्रांत
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II १ II
वरी नाचणी भात पिकवितो कोंकणचा प्रांत
गहूं बाजरी कापुस शाळू देशावर होत
कांबळ खांदी वहाण पायीं डोईस मुंडासें
श्यामलवर्णी सान रूप तव सोज्वळ मज भासे
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II २ II
वीर प्रतापी राय शिवाजी छत्रपती अमुचा
धर्म रक्षण्या एकची केला घोष स्वराज्याचा
भगवा झेंडा धन्य करी हें आनंद-वन-भुवन
स्वातंत्र्याच्या जरिपटक्याला लक्षवेळ नमन
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ३ II
भीमा वाही तिच्या सुरावर गाई जी गीत
तीच मराठी भाषा अमुची ठसली हृदयात
ज्ञानेशाची ओवी अभंगवाणी तुकयाची
श्लोक वामनी जिला भूषवी आर्या मयुराची
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ४ II
मुक्ताबाई तशी जनाई आळविते देवा
सद्भावाला सहज लाभतो मोक्षाचा ठेवा
गतवीरांचीं पुण्य चरित्रें गाऊनि अंगाई
बाळा करितें महाराष्ट्राची भगिनी वा आई
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ५ II
— दत्तो आप्पाजी ऊर्फ दाजीसाहेब तुळजापूरकर
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा IIधुII
सह्याद्रिच्या सहस्र शिखरीं उन्नत झालेला
गोदा कृष्णा भीमा ह्यांनी पुनीत केलेला
पश्चिम सिंधु बंधु पाठिशी पूर्वोदधि जामात
विंध्याद्रीची ऊंची लक्षी सातपुडा प्रांत
रजःकणाला लावुनि भाळीं महाराष्ट्र देशाअलंकार जयाचे पैठण पंढरपूर
आळंदी, चाफळ, देहू, तुळजापूर
किं पुणे, रायगड शिवनेरी सुंदर
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II १ II
वरी नाचणी भात पिकवितो कोंकणचा प्रांत
गहूं बाजरी कापुस शाळू देशावर होत
कांबळ खांदी वहाण पायीं डोईस मुंडासें
श्यामलवर्णी सान रूप तव सोज्वळ मज भासे
वीरांना त्या वंदन अमुचें महाराष्ट्र देशाते विळे कोयते शस्त्रें हीं हातिचीं
तीं बटी ठेंगणी भीमेच्या काठींचीं
मिळविती धुळीला कीर्ती बादशाहीची
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II २ II
वीर प्रतापी राय शिवाजी छत्रपती अमुचा
धर्म रक्षण्या एकची केला घोष स्वराज्याचा
भगवा झेंडा धन्य करी हें आनंद-वन-भुवन
स्वातंत्र्याच्या जरिपटक्याला लक्षवेळ नमन
स्मरणें स्फुरतें हृदय वाकतें महाराष्ट्र देशापुण्याई पुरली शिवभुपाची पुढें
पेशवे पुण्याचे वळले अटकेकडे
साम्राज्य मराठी पसरे चोहोंकडे
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ३ II
भीमा वाही तिच्या सुरावर गाई जी गीत
तीच मराठी भाषा अमुची ठसली हृदयात
ज्ञानेशाची ओवी अभंगवाणी तुकयाची
श्लोक वामनी जिला भूषवी आर्या मयुराची
संतमंडळा लववू माथा महाराष्ट्र देशाएकनाथ, चोखा, गोरा, ज्ञानेश्वर
रामदास, तुकया, नामा, मुक्तेश्वर
नच जात पाहतो भक्तांची ईश्वर
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ४ II
मुक्ताबाई तशी जनाई आळविते देवा
सद्भावाला सहज लाभतो मोक्षाचा ठेवा
गतवीरांचीं पुण्य चरित्रें गाऊनि अंगाई
बाळा करितें महाराष्ट्राची भगिनी वा आई
प्रणिपात असो ह्या देवींना महाराष्ट्र देशाशोभवी अहिल्या होळकरांचे पुरी
ती सती रमा भट-वंशाला उद्धरी
स्वातंत्र्य-लक्ष्मी प्रचंड संगर करी
तुला प्रभातीं प्रसन्न हृदयें प्रणाम परमेशा II ५ II
— दत्तो आप्पाजी ऊर्फ दाजीसाहेब तुळजापूरकर
No comments:
Post a Comment