मनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll
या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते
किति दुर्दैवी, प्राणी असतिल असले l जे अपराधाविण मेले
लाडका बाळ एकुलता
फांशीची शिक्षा होतां
कवटाळुनि त्याला माता
अति आक्रोशें, रडते केविलवाणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १ ll
"किती वेळ असा, शोक करिसि गे असला l दे निरोप मज जायाला
होईल पहा, विफल तुझा आकांत l बाहेर उभे यमदूत
ते चाकर सरकाराचे
नच उलटें काळिज त्यांचें
परि शरमिंदे अन्नाचे
तुजपासुनियां, नेतिल मज ओढोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll २ ll
तुज सोडुनि मी, जाइन कां गे इथुन l परि देह परस्वाधीन
बघ बोलति हे, बोल मुक्या भावाचे l मम दोरखंड दंडाचे
अन्न्पाणि सेवुनि जिथलें
हें शरीर म्यां पोशियलें
परदास्यिं देश तो लोळे
स्वातंत्र्य मला, मिळेल मग कोठोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ३ ll
कां परक्याला, बोल उगिच लावावा l दैवानें धरिला दावा
लाभेल कधीं, सांग कुणाला जगतीं l या जळत्या घरिं विश्रांती
घेऊनि उशाला साप
येईल कुणाला झोंप
हा सर्व ईश्वरी कोप
हा परवशता, करते भयकर करणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ४ ll
मज फांशीची, शिक्षा दिधली जाण l न्यायाचा करुनी खून
या मरणाची, मौज कशी बघ असते l सांगेन तुला मी माते
मी राजपुत्र दिलदार
घेऊनि करीं समशेर
भोंवतीं शिपाई चार
करितील अतां, स्वागत जन मैदानीं l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ५ ll
मजसाठिं तिनें, सिंहासन निर्मियलें l त्या एका खांबावरलें
मी वीर गडी, चढेन गे त्यावरतीं l इतरांची नाहीं छाती
इच्छिली वस्तु ध्यायाला
अधिकारी तैनातीला
प्राणापरि जपती मजला
या दुनियेची, दौलत लोळे चरणीं l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ६ ll
या सर्वांचे मजवर भारी प्रेम l देतील खडी ताजीम
हें वैभव मी, विकत घेतलें साचें l देउनी मोल जिवाचें
या गळ्यांतला गळफांस
देईल घडीभर त्रास
लाभेल मुक्ति जीवास
वर जाइन मी, लाथ जगा हाणोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ७ ll
या देहाची, करुं कशाला चिंता l होईल तें होवो आतां
कुणि करुणेचे, सागर हळहळतील l कुणि हंसणारे हंसतील
अश्रूंनीं न्हाऊ घाला
प्रेमाचें वेष्टण त्याला
मातीचा मोहक पुतळा
जाईल पहा, क्षणांत मातिंत मिळुनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ८ ll
सांगतों तुला, शपथ घेउनी आई l मरणाला भ्यालों नाहीं
आठवीं मनीं, श्रीगीतेचें सार l कीं नश्वर तनु जाणार
हृदयाचे मोजुन ठोके
बघ शांत कसे आहें तें
वाईट वाटतें इतुकें—
तव सेवेला, अंतरलों मी जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ९ ll
माउली तुझा, नव्हें नव्हें मी कुमार l पूर्वीचा दावेदार
तव सौख्याच्या, वाटेवर निर्मियले l दु:खाचे डोंगर असले
नउ मास भार वाहून
बाळपणी बहुपरि जपुन
संसार दिला थाटून
परि बनलों मी, खचित अभागी प्राणी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १० ll
'मम बाळ गुणी, वृद्धपणी बहुसाल l आम्हांला सांभाळील'
तव ममतेचे, बोल ऐकले असले l परि सारें उलटें झालें
माउली विनंती तुजला
सांभाळ तिला, बाळाला
नच बघवे तिकडे मजला
हा कठिण गमे, प्रसंग मरणाहहूनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll ११ ll
लाभतें जया, वीर-मरण भाग्याचें l वैकुंठपदीं तो नाचे
दे जन्म मला, मातृभूमिचे पोटीं l पुन:पुन्हां मरण्यासाठीं
मागेन हेंच श्रीहरिला
मातृभूमि उद्धरण्याला
स्वातंत्र्यरणीं लढण्याला
तव शुभ उदरीं, जन्म पुन्हां घेवोनी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll १२ ll
मग यमदुतें, ओढुनि त्याला नेलें l व्हायाचें होउनि गेलें
परि त्या ठायीं, शब्द उमटती अजुनी l 'भेटेन नऊ महिन्यांनी'
खांबाला फुटतील फांटे
मृदुसुमसम होतिल कांटे
हिमगिरिला सागर भेटे
परि परवशता, सुखकर झाली नाहीं l दे कुंजविहारी ग्वाही ll १३ ll
— कुंजविहारी (हरिहर गुरुनाथ सलगरकर, कुलकर्णी)

पाठ्यपुस्तकात फक्त पांचच कडवी होती. देशाकरिता आनंदाने फाशी जाणार्या एका वीरयुवकाचे हे उद्गगार कवीने अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने चित्रित केले आहेत. आपल्यासारख्या व्यक्तीच्या मरणातूनच राष्ट्राचा पुनर्जन्म होत असतो अशी त्याची श्रद्धा आहे. पुन्हा याच भूमीत आणि याच आईच्या पोटी जन्म मिळावा हीच त्याची शेवटची इच्छा.
28 comments:
atishay surekh chitran kelay salgarkaranni swatantryayodhhyanchya mantale........ its great
Nice poem
Heart touching and inspiring poem
Very nice
Khupach sunder asa sangrah pahije
अतिशय ह्रदयस्पर्शी कविता ...आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सूपूत्रा चा मातेचा निरोप घेताना चा हा संवाद मनाला भावनिक केल्या शिवाय राहत नाही ...अशी सुंदर रचना देणाऱ्या आदरणीय सलगरकर सरांना शतशः धन्यवाद !!!
अति सुंदर
खूपच सुंदर
खूप छान...
धन्यवाद...सगळी कविता वाचायला मिळाली...
भारतमातेचे लाडके पुत्र...त्यांना नमन
काळजाला हाथ घालणारी कविता😑😑
Dhanyvaad 1989 sali ajoba mala aikuvun zopvache satat 29 varsh shodat hot he kavya athavn manun thank you
Jai Hind
Jai hind
शब्द कमी पडतील
थँक्स,माझी आई ही कविता ऐकवायची ,तेंव्हा आईच्या नि आमच्या डोळयाना धारा लागायच्या,आज ही कविता मिळाली आणि वाचताना आईचाच आवाज ऐकू आला. खूप प्रेरणादायी ,हुतात्म्यांना सलाम!!!
अप्रतिम अशी एक रुदयस्पर्ष कविता.
💐💐💐💐
अतिशय सुंदर मला इयत्ता१० वीला होती 1994-95
ह्रदयस्पर्शी कविता
No words.... Very nice
Jai bhim like it
Aamachya Pawar madam nee shikavali hoti
Ajahi tyancha aawaz aiku yeto.
Bahutek 1995-96
Ekada parat check karata ka?
मातेच्या व मातृभूमीच्या होणाऱ्या विरहाचा आंतरिक सल व अंधारी रात्र संपून येणाऱ्या प्रकाश पर्वाची आस. हृदय विदारक भावनांचं ओतप्रोत दर्शन.
माझे आजोबा, रघुनाथ रामचंद्र जोशी, स्वातंत्र्य सैनिक होते. ते ही कविता, 'शहीद भगतसिंग ' चा पोवाडा म्हणून गात असत. त्यांनी अशी पार्श्वभूमी सांगितली होती, की शहीद भगतसिंग यांनी तुरुंगात त्यांना भेटायला आलेल्या आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू पाहून ही कविता आपल्या आईला उद्देशून म्हटली. आजोबा बरोबर आम्ही देखिल जायचो. ही कविता म्हणताना डोळे पाणावतात, ऊर भरून येतं.....
डॉ.योजना गोखले
माझ्या आठवणीतली कवीता आहे, मला खूप आवडते
बरोबर
Post a Comment