तसे हे गाव आणि मी एकमेकांचे काहीच लागत नव्हतो देणे
टिपायचे होते तेवढे टिपून घेतले झाले चोचीत दोनचार दाणे
मग गावासाठी मी उरले नाही आणि संपले माझ्यापुरते हे गाव,
पुन्हा शोधणे: नवे रस्ते, नवी माणसे, पुन्हा एखादे नवे गाव.
याहून दरवेशी बरा. निदान त्याला असते सोबत चड्डी घातलेले
एखादे माकड नाहीतर अस्वल. आणि असतो हाताशी जुना तरीही
प्रत्येक दारापुराता नवा खेळ. शिवाय प्रत्येक प्रेक्षक उत्सुक प्रसन्न डोळ्यांनी
स्वागत करतो, हातावर ठेवतो एखाद दुसरे नाणे; निदान चार घरांमागे तर
हक्काचे असतातच वरून नेमून दिलेले पायलीभर दाणे.
आणि दरवेशाला ओळखतात सारे रस्ते. झाडे, मुले, माणसे दरवर्षी नव्याने
तेवढे असतात त्याचे नि गावाचे ऋणानुबंध.
पण आपण चालावे. दरवेशी नसलो तरी. सोबत घेऊन आपली सावली.
शोधावा नवा रस्ता. पायांना जर फुटल्याच आहेत दिशा आणि जर आहेतच
गावे प्रत्येक रस्त्यावर, तर सापडेलही एखादे आपल्यासाठी थांबलेले.
नाही तर हा आहेच रस्ता रस्त्यांना मिळणारा आणि ते रस्ते
दुसर्या रस्त्यांना मिळत जाणारे.
— प्रभा रामचंद्र गणोरकर
(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

No comments:
Post a Comment