आई, मला छोटीशी बंदूक दे ना !
बंदूक घेईन l
शिपाई होईन l
ऐटीत चालीन l
एक दोन तीन ll १ ll
आई, मला छोटीशी तलवार दे ना !
तलवार घेईन l
सरदार होईन l
शत्रूला कापीन l
सप सप सप ll २ ll
आई, मला छोटीशी मोटार दे ना !
मोटार घेईन l
ड्रायव्हर होईन l
गावाला जाईन l
पों पों पों ll ३ ll
आई, मला छोटेसे विमान दे ना !
विमान घेईन l
पायलट होईन l
आकाशी जाईन l
भर भर भर ll ४ ll
आई, मला छोटीशी बाहुली दे ना !
बाहुली घेईन l
तिला मी सजवीनl
ती संगे नाचेन l
छुम छुम छुम ll ५ ll
बंदूक घेईन l
शिपाई होईन l
ऐटीत चालीन l
एक दोन तीन ll १ ll
आई, मला छोटीशी तलवार दे ना !
तलवार घेईन l
सरदार होईन l
शत्रूला कापीन l
सप सप सप ll २ ll
आई, मला छोटीशी मोटार दे ना !
मोटार घेईन l
ड्रायव्हर होईन l
गावाला जाईन l
पों पों पों ll ३ ll
आई, मला छोटेसे विमान दे ना !
विमान घेईन l
पायलट होईन l
आकाशी जाईन l
भर भर भर ll ४ ll
आई, मला छोटीशी बाहुली दे ना !
बाहुली घेईन l
तिला मी सजवीनl
ती संगे नाचेन l
छुम छुम छुम ll ५ ll
– अज्ञात
2 comments:
उजळणी आठवली राव
कवितेत साठवलेले माझे बालपण दिसले, व डोळे भरून आले, मी माझी सर्व पुस्तके जपून ठेवली होती पण जागे अभावी बाबांनी विकली पण आता इथे सापडली धन्यवाद तुमचे 🙏🙏
Post a Comment