A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

27 February 2012

अम्ही तर जंगलची पांखरें

शेत-माउली अमुच्यासाठी, अम्ही तिची लेंकरें
अम्हांला कमी कोणते बरें ?
उजाडतां दिन खावा भाजुन रोज तुरीचा हुळा,
जरा का जठराग्नी कावला
वाणीच्या कसदार नारळी-हुरड्याची ती चवी
पांचही पक्वान्नां लाजवी
माघातिल चवदार हरभरा ऐन रकाण्यावरी
थोडकी काय मजा दे तरी
खुडुनि मुगाच्या शेंगा कधि कोंवळ्या
जातां येतां खाव्या पाट्यांतल्या
गुळचट शेंगा चवळीच्या वां जरठ पोपटी भल्या
लागती भाजुनि किती चांगल्या ! ll १ ll


तोडावी कधिं बोरें कांटे काठीने दाबुनी
हिंडतां काष्ठी रानींवनीं
मध चाखावा गोड मोहळा वरच्यावर झाडुनी
फिरकतां दाट चिलाटींतुनी
किति सेवावी त्या जंगलच्या मेव्याची माधुरी
फळे तशिं खावीं तीं कितितरी
पसरुनि पानांवरी शिदोऱ्या सोडाव्या तरुतलीं
करावी दुपारची न्याहरी
बाजरिची ती गोड शिळी भाकरी
लसूण कांदा चटणी मग तीवरी
मारित मिटक्या येथेच्छ खातां सुधा तुच्छ बापुडी
सुरांची पडेल नवल न उडी ! ll २ ll


स्फटिकासम हा निर्मळ झुळझुळ जवळ वाहता झरा
ओंजळी भरून प्यावें जला
गुरें पोहणी द्यावीं, काळेशार डोह पाहुनी
डुबावें तुडुंब जली मागुनी
गर्द सांवली आंब्याखाली काय मजा लोळतां
वायुची झुळुक गार लागतां
फुंकुनि पावा नाद भरावा गोड वनीं सुस्वरीं
चढोनी रातीं माळ्यावरी
धनवंता-घरि काय कुणा यासम
लाभतील ही गोड सुखें निरुपम !
महाल-माडी अम्हां झोपडी, रान सदा मोकळे
अम्ही तर जंगलची पांखरें. ll ३ ll


— पांडुरंग श्रावण गोरे  


(Compiled by Ms. Sushama Sahasrabuddhe)

8 comments:

निसर्गवार्ता said...

छान कविता ! परंतु सरकारच्या शेती,शेतकरीविरोधी धोरणांमुळे असे वैभव पुन्हा अनुभवणे दुर्मिळच !

ऊध्दव गावंडे said...

पां.श्रा.गोरे यांची 'विटंबना'शिर्षक असलेली कविता वाचायला मिळेल का? मी खुप शोध घेतला पण मिळाली नाही. लहानपणी दहावी च्या अभ्यासक्रमात वाचली होती.आपल्या ब्लाँग ने थेट शालेय जीवनात नेऊन या धकाधकीच्या वातावरणातील चिंताग्रस्त अवस्थेतून चिंतामुक्त अवस्थेत अलगद नेऊन ठेवले.खूप खूप धन्यवाद !
-ऊध्दव गावंडे
uddhavgawande@gmail.com

Unknown said...

पांडूरंग श्रावण गोरेंची जन्मतारीख मिळेल का ?

Suresh Shirodkar said...

पांडुरंग श्रावण गोरे यांची जन्मतारीख उपलब्ध नाही.

Suresh Shirodkar said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

मेलयावर कारे लखजवता ही कविता मिळेल का

Unknown said...

Yavatmal che kvi

Unknown said...

Kath takleli nahin chi part milel ka?