उंच उंच डोंगर भवती I चढले नील नभांत
भिरभिर वारा व्यापुनियां I टाकी सारा प्रांत II १ II
तरुवेलींनीं फुललेल्या I त्या खोऱ्यांत सुरेख
झुळझुळ वाहे निर्झरिणी I स्फटिकावाणी एक II २ II
तोंच कुणी चपळाईनें I डोंगर वेधुन थोर
करवंदे विकण्यासाठी I ये भिल्लाचा पोर II ३ II
शाळिग्रामासम काळा I देह कसा घोटींव
तेजदार नागावाणी I दिसे कोवळा जीव II ४ II
स्वच्छ गोल डोळ्यांत नसे I भीतीचा लवलेश
साधा भोळा भाव मुखी I आणि दिसे आवेश II ५ II
ओठ चिमुकले विलग जरा I होती मधुन मधून
शुभ्र हिरकण्यांसम दिसती I दंत किती शोभून II ६ II
एक करीं घेऊनि परशू I दुसऱ्या हातीं द्रोण
"करवंदे घ्या करवंदे" I सांगतसे गर्जून II ७ II
असेल याची पर्णकुटी I जवळच रम्य निवांत
मातापितरांसह तेथे I रहात हा सौख्यांत II ८ II
स्वातंत्र्याचा खराखुरा I शाहिर आहे हाच
नागरवस्तीचा नाही I या जीवाला जाच II ९ II
पक्ष्यांची ऐकत गाणी I देत तयांना ताल
हिंडावे रानोरानीं I आनंदांत खुशाल II १० II
घाट सोडुनी कधीच ये I गाडी निघुनी दूर
परि न हले डोळ्यांपुढुनी I तो भिल्लाचा पोर. II ११ II
— गोपीनाथ (गोपीनाथ गणेश तळवलकर)

7 comments:
सुरेश शिरोडकर तुमचे खूप खूप आभार.. भिल्लाचा पोर ही कविता माझा मामा नेहमी आमच्या लहानपणी आमच्या साठी म्हणत असे,परंतु ती कोणाला ही पूर्ण आठवत न्हवती, ती संपूर्ण कविता आज आपल्या मुळे मिळाली.. धन्यवाद!!!!
धन्यवाद!!
खूप खूप धन्यवाद.माझी आई माझ्या मुलीला झोपवताना ही कविता म्हणत असे. आता माझ्या नातवाला ही कविता म्हणताना नीट आठवत नव्हती, आता पूर्ण आठवली. फारच सुंदर आहे कविता. परत एकदा आभार. अमृता सोमण.
हे दिव्य दीपज्योति दाखीव मार्ग माते
जावोत ना पदे ही सोडून सत्पथाते
ही तळवलकरांची कविता [lead me kindly light] या कवितेचे मराठी रुपांतर उपलब्ध असल्यास मला मिळू शकेल का ?
खूपच सुंदर कविता आहे ही. माझी आई नेहमी म्हणायची. त्यातील 7/8/9 ही तिनंच कडवी मला आठवत होती. पण आज तुमच्यामुळे ही संपूर्ण कविता प्राप्त झाली. खरच आपले हार्दिक आभार.
माझ्या आजीने संपूर्ण कविता मला म्हणून दाखवली ही 2011 साली. खुप छान कविता आहे.
खूप खूप आभार।
सुमारे पन्नास वर्षे पूर्वी माझी आई ही कविता म्हणायची।
आज तीची आठवण आली।
Post a Comment