ऊठ गोपाळजी, जाइं धेनूकडे,
पाहती सौंगडे, वाट तूझी ll धृ. ll
लोपली हे निशी, मंद झाला शशी,
मुनिजन मानसीं, ध्याति तुजला ll १ ll
भानु उदयाचळी, तेज पुंजाळलें,
विकसती कमळे, जळामाजीं ll २ ll
धेनुवत्सें तुला, बाहती माधवा,
ऊठ गा यादवा! उशीर झाला ll ३ ll
उठ पुरुषोत्तमा! वाट पाहे रमा,
दाविं मुखचंद्रमा, सकळिकांसी ll ४ ll
कनकपात्रांतरीं, दीपरत्ने बरीं,
ओवाळिती सुंदरी, तूजलागीं ll ५ ll
जन्मजन्मांतरीं, दास होऊ हरी,
बोलती वैखरी, भक्त तूझे ll ६ ll
कृष्णकेशव करीं, चरणांबुज धरी,
ऊठ गा श्रीहरी मायबापा ! ll ७ ll
- कृष्णकेशव
पाहती सौंगडे, वाट तूझी ll धृ. ll
लोपली हे निशी, मंद झाला शशी,
मुनिजन मानसीं, ध्याति तुजला ll १ ll
भानु उदयाचळी, तेज पुंजाळलें,
विकसती कमळे, जळामाजीं ll २ ll
धेनुवत्सें तुला, बाहती माधवा,
ऊठ गा यादवा! उशीर झाला ll ३ ll
उठ पुरुषोत्तमा! वाट पाहे रमा,
दाविं मुखचंद्रमा, सकळिकांसी ll ४ ll
कनकपात्रांतरीं, दीपरत्ने बरीं,
ओवाळिती सुंदरी, तूजलागीं ll ५ ll
जन्मजन्मांतरीं, दास होऊ हरी,
बोलती वैखरी, भक्त तूझे ll ६ ll
कृष्णकेशव करीं, चरणांबुज धरी,
ऊठ गा श्रीहरी मायबापा ! ll ७ ll
- कृष्णकेशव
4 comments:
Nazi aaji hi bhupali manyachi. Mala aaaj tichi khoop athavn ALI.
Nazi aaji hi bhupali mhanyachi. Mala tichi athavan zali
मला वाटते साहित्यशोभा या पाठ्यपुस्तकांत ८वी इयत्तेत ही कविता अभ्यासली होती १९५५ सालीं किंग जाॅर्ज शाळेंत दादर मुंबई येथे. माझी आवडती कविता. प्रदीप कृृृृृृष्णराव आठवले. पुणें ४११.०१६ .
माझे वडील जे आता हयात नाहीत ते पहाटे आम्हाला उठविण्यासाठी ही भूपाळी म्हणायचे. अतिशय सुंदर चालीत गायचे. कृष्णाचे भक्तिरस पूर्ण असे वर्णन करणारी ही कृष्ण केशव यांची अप्रतिम रचना आहे. कुणाला चाल आठवत असेल त्यावेळची तर कृपया संपर्क करा ntcanag @gmail .com
Post a Comment