(पृथ्वी)
पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे;
दयामृतरसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे;
प्रसादपट झांकिती परि परा गुरूंचे थिटे;
म्हणूनि म्हणती भले, न ऋण जन्मदेचें फिटे ॥ २२ ॥
तुम्ही बहु भले, मला उमज होय ऐसे कथा;
कसा रसिक तो, पुन्हा जरि म्हणेल आली कथा
प्रतिक्षण नवीच दे रुचि शुकाहि संन्यासिया;
न मोहिति भवत्कथा अरसिका अधन्यासि या ॥ २३ ॥
तुझें यशचि तारितें परि न केवला तारवे;
सहाय असिला असे, तरिच शत्रूला मारवे;
न भागवत भेटतां, न घडतांहि सत्संगती
न अज्ञहृदयें तशीं तव यशोरसी रंगती ॥ २४ ॥
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो
कळंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो,
सदन्घ्रिकमळी दडो; मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो; मन भवच्चरित्री जडो ॥ २५ ॥
न निश्चय कधी ढळो; कुजनिविघ्नबाधा टळो,
न चित्त भजती चळो; मति सदुक्तमार्गी वळो,
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो,
पुन्हा न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो ॥ २६ ॥
मुखी हरि ! वसो तुझी कुशळधामनामावली,
क्षणांत पुरवील ती सकल कामना, मावली;
कृपा करिसि तू जगत्सयनिवास दासांवरी,
तसी प्रकट हे नीजश्रितजनां सदा सांवरी ॥ २७ ॥
दयामृतघना ! अहो ! हरि ! वळा मयूराकडे,
रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे
असा अतिथि धार्मिकस्तुतपदा ! कदा सांपडे ?
तुम्हां जड भवार्णवी उतरितां न दासां पडे ॥ २८ ॥
— मोरोपंत (मोरेश्वर रामचंद्र पराडकर)
वास्तविक केकावलीमध्ये जवळ जवळ १२२ श्लोक आहेत, त्यातील काही निवडक इथे देण्यात आले आहेत.
7 comments:
cant copy paste
Copy pest is not allowed but if you want any poem it can be mailed to you.
1978 ते 1983 या काळातील बालभारती आणि कुमारभारती पुस्तके कुठे मिळतील का
माझ्या ई-मेल वर वरील केकावली पाठवा. arvindbordekar96938@gmail. com
Google वर ebalbharti या नावाने search करा.Home page वर पहिले मराठी select करुन नंतर इयत्ता व वर्ष select करा. बरीचशी पुस्तकं उपलब्ध आहेत.
मला माझ्या आईसाठी
'कुजबूज कुजबुज कुजबुज कुजबुज
कुजबुज कुजबुज कुजबुज कुजबुज रे
पारध्याला हिव आले आज न दगा'
ही कविता हवी आहे. कृपया पाठवाल का?
- डॉ निलेश महामुनी
ई-मेल: nileshmahamunida@gmail.com
आटपाट नगरात नांदे राजाची ग राणी
नवा तिचे मैना राणी
ही खूप जुनी कविता कोणाकडे असेल तर कृपया पाठवा
Post a Comment