" गर्द सभोंतीं रान साजणी, तूं तर चाफेकळी !
काय हरवलें सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी ? " ॥ ध्रु ॥
ती वनमाला म्हणे " नृपाळा, हें तर माझें घर;
पाहत बसतें मी तर येथें, जललहरी सुंदर,
हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे—
भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें " ॥ १ ॥
" रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी ! तुला;
तूं वनराणीं, दिसे न भुवनीं तुझिया रुपा तुला
तव अधरावर मंजुळ गाणीं, ठसलीं कसलीं तरी ;
तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी !
क्रिडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,
भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी;
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं. " ॥ २ ॥
सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं घडे;
हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.
ती वनमाला म्हणे नृपाळा " सुंदर मी हो खरी " ॥ ३ ॥
— बालकवी
तळटीप : मत्स्यगंधा (१९६४) नाटकातले हे गीत आशालता वाबगावकर यांनी पूर्ण गायीलेले नाही.काय हरवलें सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी ? " ॥ ध्रु ॥
ती वनमाला म्हणे " नृपाळा, हें तर माझें घर;
पाहत बसतें मी तर येथें, जललहरी सुंदर,
हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे—
भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें " ॥ १ ॥
" रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी ! तुला;
तूं वनराणीं, दिसे न भुवनीं तुझिया रुपा तुला
तव अधरावर मंजुळ गाणीं, ठसलीं कसलीं तरी ;
तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी !
क्रिडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,
भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी;
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं. " ॥ २ ॥
सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं घडे;
हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.
ती वनमाला म्हणे नृपाळा " सुंदर मी हो खरी " ॥ ३ ॥
— बालकवी
3 comments:
सुंदर ! आभार ! :) आणि तळ टिपेबद्दल तर फारच धन्यवाद ! :)
http://www.aathavanitli-gani.com/Song/Garda_Sabhoti_Ran_Sajani
Mst
Ha taltip dilya baddal abhar
Post a Comment