गरिब बिचारा माधुकरी, दु:ख तयाला जन्मभरी ll ध्रु. ll
कडक उन्हानें जीव घाबरे, कपोल सुकले घर्मे भिजले
पायी चटके; तापे डोके, धांपा टाकीत पळे जरी ll१ ll
बुरबुर लागे पाऊसधारा, चिखल माखला अंगी सारा
घट्ट तपेली, झोळी धरिली, धांवत जातो घरोघरी ll २ ll
भणभण झोंबे वारा अंगा, बधीर गात्रें पायीं भेगा
हात कांपती, दांत वाजती, कुडकुडतो हा घडी घडी ll ३ ll
विटक्या अपुर्या मुकट्यावांचुनी, वस्त्र दुपारी अंगी कोठुनि
हि धार्मिकता लोकांकरितां, नित्य सोशितो कष्ट जरी ll ४ ll
सण आनंदी घरोघरी जरि, नित्य कपाळी सुटे न वारी
शिळी बुरसली, खवट आंबली, अशीच नशिबी सदा भाकरी ll ५ ll
'उशीर' कोठे कुठें 'संपले' मिळे कालवण भाग्य उदेले
नांवा धरिली करी तपेली, अश्रू तोंडी, घांस गिळी ll ६ ll
झोळी थोडिहि अजुनि न भरली, शाळेची तर घंटा झाली
मुख हिरमुसले, घांस कोंबले; दप्तर घेउनि पळे जरी ll ७ ll
शिळे त्यांतले रात्रीकरितां, निजे उपाशी अपुरे पडतां
कुणा कळवळा येई बोला, दु:ख तयाचे अणूपरी ll ८ ll
नंबर गेला एक खालती, जाईल नादारी ही भीती
सांजसकाळी अभ्यासच करि, फुरसत खेळा कुठे तरी ll ९ ll
गोसावी, भट, धन्य भिकारी, तेलंग्याचे भाग्य कितीतरि
पैसा दूरच, पुस्तक धोतर, जुने द्यावया नसे घरी ll १० ll
निजे कुणाच्या ओटीवरती, अर्धे धोतर खाली वरती
एकच सदरा तोच उशाला; दया न येते जगा परी ll ११ ll
यजमानाला पलंग गिरदी, आंत उकडते खुपते गादी
पोटी धरुनी पाय जुळवुनी, कुडकुडतो हा रात्रभरी ll १२ ll
पुण्यांत आला अभ्यासाला, पदोपदी जग अडवी त्याला
विद्या करितो, हाल सोशितो, शूर नव्हे का खरोखरी
- श्रीधर बाळकृष्ण रानडे

गरिब बिचारा माधुकरी? ll १३ ll
- श्रीधर बाळकृष्ण रानडे
5 comments:
ashi dukhkh aathavli tarach aaplya sukhkhnci kimmat kalate... thanks for post......
Sir...very nice to read...i remmember my father ...sir on which period same poet was in syllabus...
ह्या कवितेतून मला साने गुरुजींच्या आठवणी जाग्या झाल्या.
अत्यंत गरिबीत किंबहुना माधुकरी मागून ह्या याचकाने आपले शिक्षण पूर्ण केले, आणि भारत मातेच्या गरीब आणि असहाय जनतेला ह्या दुःख, दारिद्य आणि संकटापासून मुक्त होण्यासाठी अहोरात्र जीवाचे रान केले,
पण नियतीला हे मान्य नव्हते, राजकारण्यांनी त्यांचा घात केला
😢😢😢😢
हे अगदी खरंच आहे
💐💐
Kavita Vachun mala majhya aai chi aathavan aali mi lahan aastana majhi aai swayampak kartana hi Kavita nehamich manayachi ticha sobat mala pan pathanatar jhali hoti. mala majhya balpanachi athavan tajhi jhali
Far Kahi shiknya joga aahe.
Post a Comment