[उपजाति]
असो कवीचें कुल अप्रसिद्ध
होई कवीच्या कवनें प्रसिद्ध
तसा नदीच्या उगमस्थलाला
नदीमुळे गौरवलाभ झाला II१II
काव्यें कवीचीं जगतांत गावी;
त्यांचे न त्यांच्या परि चोज गांवीं.
नदी सुदूरुस्थ जनां पवित्र
विटाळिती तीर्थ तिचेच पुत्र II२II
बाल्यात उच्छॄंखलवृत्ति दोन्ही
ठावा नसे आडथळा म्हणोनी;
लागो दरी खोल, उभा पहाड,
जातात तीं धांवत धाड धाड ! II३II
जाई जसे अंतर होत खोल
गांभीर्य ये वृत्ति निवे विलोल.
रेखून मार्ग क्रमितात संथ
करीत कल्याण जगी अनंत II४II
अभंग त्यांच्या हृदयीं तरंग
नी:संग ते त्यांत सदैव दंग,
गाऊन गाणीं भ्रमतात रानीं,
ते धन्य ज्यांच्या पडतात कानीं II५II
स्वजीवनानें उगवून दाणे,
नदी जिवां दे चिर जीवदानें.
तैसें कवीच्या कविताप्रवाहें
जीवांत संजीवन दिव्य लाहे II६II
राष्ट्रे बुडालीं नृप थोर गेले;
नदी कवी मात्र अनंत ठेले !
भागीरथीला खळ लेश नाही
अखंड रामायण लोक गाई II७II
महाकवी थोर नदाप्रमाणें;
मी बापडा ओघळ अल्प जाणें.
धाकें न ओढा झुळझूळ वाहे
माझी तशी ही गुणगूण आहे ! II८II
— विनायक
(श्री. श्रीकृष्ण जोशी यांच्या मदतीने)
असो कवीचें कुल अप्रसिद्ध
होई कवीच्या कवनें प्रसिद्ध
तसा नदीच्या उगमस्थलाला
नदीमुळे गौरवलाभ झाला II१II
काव्यें कवीचीं जगतांत गावी;
त्यांचे न त्यांच्या परि चोज गांवीं.
नदी सुदूरुस्थ जनां पवित्र
विटाळिती तीर्थ तिचेच पुत्र II२II
बाल्यात उच्छॄंखलवृत्ति दोन्ही
ठावा नसे आडथळा म्हणोनी;
लागो दरी खोल, उभा पहाड,
जातात तीं धांवत धाड धाड ! II३II
जाई जसे अंतर होत खोल
गांभीर्य ये वृत्ति निवे विलोल.
रेखून मार्ग क्रमितात संथ
करीत कल्याण जगी अनंत II४II
अभंग त्यांच्या हृदयीं तरंग
नी:संग ते त्यांत सदैव दंग,
गाऊन गाणीं भ्रमतात रानीं,
ते धन्य ज्यांच्या पडतात कानीं II५II
स्वजीवनानें उगवून दाणे,
नदी जिवां दे चिर जीवदानें.
तैसें कवीच्या कविताप्रवाहें
जीवांत संजीवन दिव्य लाहे II६II
राष्ट्रे बुडालीं नृप थोर गेले;
नदी कवी मात्र अनंत ठेले !
भागीरथीला खळ लेश नाही
अखंड रामायण लोक गाई II७II
महाकवी थोर नदाप्रमाणें;
मी बापडा ओघळ अल्प जाणें.
धाकें न ओढा झुळझूळ वाहे
माझी तशी ही गुणगूण आहे ! II८II
— विनायक
(श्री. श्रीकृष्ण जोशी यांच्या मदतीने)
4 comments:
hi air i like to reads marathi kavita mala 4 th madhil amrataru hi kavvita pathavata ali tar chan hoihil
amrataru ha dari shiravar poremal nij sahuli
hi kavita 'Vinayak' (Vinayak Janardan Karandikar) yanchi aahe. - Shrikant Dhundiraj Joshi
नदी आणि कवीचं इतकं समर्पक साम्य वर्णन "विनायका" शिवाय शक्य नाही. म्हणून म्हणतात ना जे ना देखे ते देखे कवी !! ... नं.ज.मुळे
माझ्या एका बालमित्राला शाळेतल्या या कवितेतील, आठवणीत राहिल्या त्या, पुढील ओळी उदाहरणादाखल मागच्या आठवड्यात ऐकवल्या: काव्ये कवीची जगतात गावी, त्याचे न त्याच्या परि चोज गांवी,..... नदी सुदुरुस्थ जना पवित्र, विटाळती तीर्थ तिचेच पुत्र. (हे आमचे मित्र प्रसिद्ध वकील असून गुणी आहेत. आमचे वय वाढत गेले तसे त्यांच्यातले गुण जास्त जास्त जाणवत गेले. वरील ओळींचे उदाहरण घेऊन त्यांच्या स्वभावातील गुण त्यांना सांगायचे होते. मात्र त्यावर त्यांनी, गमतीने प्रतिसाद दिला की घरी तर त्यांना सर्वसाधारण व्यक्ती एवढंच महत्त्व असते. वरील ओळी त्यांना ऐकवाव्या लागल्या. आपल्या ब्लॉगमध्ये, आम्हाला शाळेत होती ती कविता पाहून आनंद झाला. धन्यवाद.... मराठीत धन्यवाद म्हणायची पद्धत नाही, म्हटले तर ते वरवरचे वाटते, किंवा असे म्हणणारी व्यक्ती काहीतरी खोटे बोलते असं वाटतं आहे,🙊😂)
Post a Comment