वेदशास्त्रांचा मथितार्थु l मर्हाटिया जोडे फलितार्थु
तरी चतुरीं परमार्थु l कां नेघावा ll १ ll
चाड चातुर्यातें जिणें l यैसें बोलती स्याहाणे
तरी येथिंचिये परमार्थु खुणे l ग्राहिक कां न होआवे ll २ ll
धुळी आंतिल रत्न l जरी भेटे न करितां प्रेत्न
तरि चतुरीं येत्न l कां न करावा ll ३ ll
जर्हि रुईचिये झाड़ीं भरती l मधाचिया कावडी
तर्हि हिंडावेयाची आडपाडी l कां पडों द्यावी ll ४ ll
जर्हि हे आरुष बोल l परी रोकडें ब्रह्मज्ञान हेँ नवल
तर्हि अवज्ञा कवण करिल l येथ विषई ll ५ ll
ऊंस किरू दिसे काळा l परी घेपे रसाचा गळाळा
तैसे आरुष बोल परि झळाळा l दिसे विवेकाचा ll ६ ll
— आद्यकवी - मुकुंदराज
स्याहाणे = शहाणे
प्रेत्न = प्रयत्न
येत्न = यत्न
किरू = वरून
घेपे = वेढणे

No comments:
Post a Comment