भंगु दे काठिन्य माझें
आम्ल जाऊं दे मनींचे;
येऊ दे वाणींत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे.
ज्ञात हेतूंतील माझ्या
दे गळू मालिन्य; आणि
माझिया अज्ञात टाकीं
स्फूर्ति-केंद्री त्वद्बियाणीं.
राहुं दे स्वातंत्र्य माझें
फक्त उच्चारांतलें गा;
अक्षरां आकार तूझ्या
फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा.
लोभ जीभेचा जळूं दे
दे थिजुं विद्वेष सारा;
द्रौपदीचें सत्व माझ्या
लाभुं दे भाषा-शरीरा.
जाउं दे 'कार्पण्य' 'मी' चें,
दे धरुं सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्र-काट्याची कसोटी.
खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेउं दे तीतून मातें
शब्द तूझ्या स्पंदनांचे
त्वत्स्मृतीचे ओळखूं दे
माझिया हातां सुकाणू;
थोर-यत्ना शांति दे गा
माझिया वृत्तीत बाणू.
आण तूझ्या लालसेची,
आण लोकांची अभागी;
आणि माझ्या डोळियांची
पापणी ठेवीन जागी.
धैर्य दे अन् नम्रता दे
पाहण्या जें जें पहाणें
वाकुं दे बुद्धीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणें;
घेउं दे आघात तीतें
इंद्रिय-द्वारां जगाचे;
पोळुं दे आंतून तीतें
गा अतींद्रियार्थांचें
आशयाचा तूंच स्वामी !
शब्दवाही मी भिकारी;
मागण्याला अंत नाही,
आणि देणारा मुरारी.
काय मागावें परी म्यां
तूंहि कैसे काय द्यावें;
तूंच देणारा जिथे अन्
तूंच घेणारा स्वभावें !!
– बा. सी. मर्ढेकर
आम्ल जाऊं दे मनींचे;
येऊ दे वाणींत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे.
ज्ञात हेतूंतील माझ्या
दे गळू मालिन्य; आणि
माझिया अज्ञात टाकीं
स्फूर्ति-केंद्री त्वद्बियाणीं.
राहुं दे स्वातंत्र्य माझें
फक्त उच्चारांतलें गा;
अक्षरां आकार तूझ्या
फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा.
लोभ जीभेचा जळूं दे
दे थिजुं विद्वेष सारा;
द्रौपदीचें सत्व माझ्या
लाभुं दे भाषा-शरीरा.
जाउं दे 'कार्पण्य' 'मी' चें,
दे धरुं सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्र-काट्याची कसोटी.
खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेउं दे तीतून मातें
शब्द तूझ्या स्पंदनांचे
त्वत्स्मृतीचे ओळखूं दे
माझिया हातां सुकाणू;
थोर-यत्ना शांति दे गा
माझिया वृत्तीत बाणू.
आण तूझ्या लालसेची,
आण लोकांची अभागी;
आणि माझ्या डोळियांची
पापणी ठेवीन जागी.
धैर्य दे अन् नम्रता दे
पाहण्या जें जें पहाणें
वाकुं दे बुद्धीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणें;
घेउं दे आघात तीतें
इंद्रिय-द्वारां जगाचे;
पोळुं दे आंतून तीतें
गा अतींद्रियार्थांचें
आशयाचा तूंच स्वामी !
शब्दवाही मी भिकारी;
मागण्याला अंत नाही,
आणि देणारा मुरारी.
काय मागावें परी म्यां
तूंहि कैसे काय द्यावें;
तूंच देणारा जिथे अन्
तूंच घेणारा स्वभावें !!
– बा. सी. मर्ढेकर
6 comments:
सुंदर रीतीने विचार व्यक्त केले आहे .
या कवितेचा अर्थ काय आहे?
आम्ल जाऊ दे मनीचे हे लोकसत्ता संपादकीय मधे अत्यंत समर्पक पणे या ओळींचा ऊल्लेख आहे. कवितेचा पूर्ण अर्थ कसा मिळेल?
Konta sangraha
"मर्ढेकरांची कविता"
धन्यवाद.
आपण जे चौथे कडवे लिहिले आहे ते माझ्या पाठांतराप्रमाणे
तिसरे आहे.
कदाचित आवृत्त्या प्रकाशित झाल्या त्यात फरक असेल.
अर्थ माझ्या पाठांतराप्रमाणे जास्त सुसंगत वाटतो.
Post a Comment