हलके हलके हसते गळते तरुचे पान न् पान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
— वा. रा. कांत
बाई, तरुचे पान न् पानपानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
हिवात राने पिवळी पडलीनक्षत्रांची रात शहारे गारव्यात हैराण
उषा धुक्यामधि ही काकडली
ओठच उलले संध्यालाली
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
थंडगार किति पवन झोंबतोगळेल वाटे चांदण्यात हे निळे नभाचे पान
ऊन्हाच्याहि उरि काटा उठतो
पानफुलांचा बहर झडपतो
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
फुले जळाली, पाने गळलीपिवळ्या पानांच्या मनि फुलते वसंतस्वप्न महान
फळांत जरि रसधार गोठली
सर्व सृष्टि जरि हिमे करपली
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
— वा. रा. कांत
No comments:
Post a Comment