तृणबाळे होऊ, क्षणभर, तृणबाळे होऊ;
गड्यांनो, तृणबाळे होवू.
पैजण घालुन नाचत मुरडत
निर्झर येइल ठुमकत ठुमकत,
हसुन करूया त्याचे स्वागत,
तुषारात न्हाऊ, क्षणभर, तुषारात न्हाऊ
गड्यांनी, तुणबाळे होवू,
चपल वारुवर आरुढ होउन
उटी फुलांची अंगी लावुन
अवखळ वारा येइल धावुन,
डुलत डुलत राहू, क्षणभर डुलत डुलत राहू;
गड्यांनो तृणबाळे होवू
निळे जांभळे लेउन मंदील
रानफुलांचे थवे शोभतिल
गोड गोड गुजगोष्टी करतील
त्या ऐकत राहू, क्षणभर, कान हळुच देवू ;
गड्यांनो तृणबाळे होवू
लांब सावल्या पडता, गगनी
रंग नाचतिल फेर धरोनी,
सोन्याची मग होईल धरणी,
टक लावुन पाहू, क्षणभर, टक लावुन पाहू;
गड्यांनो तृणबाळे होवू
आणि कधिमधि सायंकाळी
येतिल फिरण्या बालमंडळी
हळु पायाला करुनी गुदगुली
गमतीने हसवू, क्षणभर, गमतीने हसवू;
गड्यांनो तृणबाळे होवू
– कृष्ण बळवंत निकुंब
Compiled by : Abhay Bapat on Facebook
गड्यांनो, तृणबाळे होवू.
पैजण घालुन नाचत मुरडत
निर्झर येइल ठुमकत ठुमकत,
हसुन करूया त्याचे स्वागत,
तुषारात न्हाऊ, क्षणभर, तुषारात न्हाऊ
गड्यांनी, तुणबाळे होवू,
चपल वारुवर आरुढ होउन
उटी फुलांची अंगी लावुन
अवखळ वारा येइल धावुन,
डुलत डुलत राहू, क्षणभर डुलत डुलत राहू;
गड्यांनो तृणबाळे होवू
निळे जांभळे लेउन मंदील
रानफुलांचे थवे शोभतिल
गोड गोड गुजगोष्टी करतील
त्या ऐकत राहू, क्षणभर, कान हळुच देवू ;
गड्यांनो तृणबाळे होवू
लांब सावल्या पडता, गगनी
रंग नाचतिल फेर धरोनी,
सोन्याची मग होईल धरणी,
टक लावुन पाहू, क्षणभर, टक लावुन पाहू;
गड्यांनो तृणबाळे होवू
आणि कधिमधि सायंकाळी
येतिल फिरण्या बालमंडळी
हळु पायाला करुनी गुदगुली
गमतीने हसवू, क्षणभर, गमतीने हसवू;
गड्यांनो तृणबाळे होवू
– कृष्ण बळवंत निकुंब
Compiled by : Abhay Bapat on Facebook
3 comments:
छान वाटले ही कविता वाचून! मी खालील सुधारणा सुचवत आहे. आपल्याला योग्य वाटल्या तर स्वीकार करावा ही विनंती!
शीर्षकात तृण असा शब्द पाहिजे. तेथे तुण असा शब्द आला आहे. तिसर्या कडव्यात निळे जांभळे लेवून मंदीर असा शब्द आला आहे. तेथे मंदील असा शब्द पाहिजे. मंदिर म्हणजे देऊळ आणि मंदील म्हणजे तुरे!
धन्यवाद
सौ मृदुल शिरगुरकर
धन्यवाद, मृदुल मॅडम
Post a Comment