स्वर्गाहुनही प्रिय अम्हांला अमुचा सुंदर भारत देश
आम्ही सारे एक, जरीही नाना जाती, नाना वेष
या भूमीच्या आम्ही कन्या, कोमल भाव मनी
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष
श्रीरामाचे, श्रीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास
वीर शिवाजी, प्रताप, बाजी.. थोर आमुचा हा इतिहास
रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश
हिमालयापरि शीतल आम्ही, आग पेटती परि उरात
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत
या देशाची गौरवगाथा हाच अम्हाला दे आदेश
— शांता शेळके

2 comments:
खुप सुंदर शब्दरचना.माझ्या लहानपणी आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे गीत नेहमी प्रसारित करण्यात येत असे.
Thanks for the information
Post a Comment